दिव्यांगांसाठी सुप्रिया सुळे यांचे नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे आंदोलन
पुणे:केद्र सरकारने ADIP आणि वयोश्री योजने अंतर्गत दिव्यांगांना सहाय्यभूत अवयव तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे या मागणीसाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलन केले.
या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप ,प्रवक्ते प्रदीप देशमुख, प्रदीप गारटकर, भारतीशेवाळे, वैशाली नागवडे, मृणाली वाणी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व दिव्यांग संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.
सुप्रिया सुळे म्हणाल्या,दिव्यांग नागरिकांसाठी काही महिन्यापासून केंद्र सरकार कोणत्याही प्रकारचे निर्णय करीत नाही. त्यातील मुख्य म्हणजे त्यांना लागणार साहित्य उपलब्ध केले जात नाही. त्यामुळे त्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
