राज्य व राष्ट्रीय महामार्गावर महिलांसाठी स्वच्छता गृह उभारण्यासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून घ्यावा… डॉ.नीलम गोऱ्हे
पुणे : जिल्हा वार्षिक योजना सन २०२३-२४ राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आले होते. यावेळी विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सर्वांचे लक्ष वेधले ते राज्य महामार्ग व राष्ट्रीय महामार्गावर महिलांसाठी स्वच्छता गृह उपलब्ध नसल्याने प्रवास करताना महिलांना मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागतो. यामुळे राज्य व राष्ट्रीय महामार्ग येथे स्वच्छता गृह उभारण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेऊन जिल्हा नियोजन समिती मार्फत निधी उपलब्ध करून देण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी बैठकीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. यावेळी श्री फडणवीस हे दृक्श्राव्य माध्यमाद्वारे उपस्थित होते. महिला स्वच्छता गृहाच्या मागणीस उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन व निधी उपलब्ध करू असे आश्वासन दिले.
सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. पुण्यात नद्यांमध्ये केमिकलयुक्त सांडपाणी सोडले असल्याबाबत डॉ.गोऱ्हे यांचे लक्ष देखील वेधले यावर उचित करावी असे सांगून सांडपाणी, घनकचरा याबाबत शहरानुसार धोरण ठरविणे आवश्यक असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील मुलींना प्रोत्साहन भत्ता दिला जातो तो एक रुपया आहे. यात राज्यस्तरीय योजना राबवून DBT द्वारे पैसे विद्यार्थ्यांना देण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती देखील डॉ गोऱ्हे यांनी सदरील बैठकीत केली.
शाश्वत विकासाची उदिष्टे १७ साध्य करण्यासाठी शासनाने निधी खर्च करण्यासाठी भर देण्याची गरज डॉ.गोऱ्हे यांनी सदरील बैठकीत व्यक्त केली. यात शाश्वत विकासाचे उद्दिष्ट ५- लिंगसमभाव (स्त्री पुरुष समानता), १०- सर्व स्तरावर विषमता कमी करणे, १२- उत्पादन व वापराची शाश्वत व्यवस्था, १४- महासागरी आणि सामुद्रिक संसाधनांचे रक्षण या उदिष्टांवर शासनाने पुढाकार निधी खर्च करण्याची सूचना डॉ.गोऱ्हे यांनी सदरील बैठकीत उपुख्यमंत्रीपद यांना केली.
त्याचबरोबर पुणे जिल्हा तीर्थक्षेत्र विकास आराखडा याबाबत शासनाने ठरविले धोरणाबाबत अधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन काम केले पाहिजे. यात राज्य शासनाने पुढाकार घेऊन पुरातत्व खात्याकडे असलेल्या तीर्थक्षेत्राचा विकास होण्यासाठी एकत्र नियोजन करण्यासाठी पाठपुरावा घ्यावा अशी डॉ.गोऱ्हे यांनी सूचना केली.
