Saturday, August 29, 2026
Latest NewsPUNE

मधुरा चौकसकर आणि रिया बोगावतच्या अरंगेत्रमने प्रेक्षक मंत्रमुग्ध

पुणे  – ‘मृदंगम्’मधून निघणारे तालाचे बोल, व्हायोलिनच्या सुरावटीतून निघणारा आर्त स्वर, नर्तकीचा मुद्राभिनय या सर्वांच्या संयोगाने होणारे भरतनाट्यमचे पदलालित्य यांचा अनोखा संगम प्रजासत्ताक दिनी अरंगेत्रममध्ये पहायला मिळाला. मुकुंदनगर येथील महाराष्ट्र मंडळाच्या सकल ललित कलाघर येथे भरतनाट्यम नृत्यांगना मधुरा चौकसकर आणि रिया बोगावत यांनी अरंगेत्रम सादरीकरण केले. गुरु सुचित्रा दाते यांच्या मार्गदर्शनाखाली वयाच्या आठव्या वर्षापासून भरतनाट्यमचे धडे घेणारी नृत्यांगना रिया आणि मधुरा हिने अरंगेत्रम सादर केले. या कार्यक्रमात दोघींनी भरतनाट्यम या नृत्यशैलीच्या विविध छटा सादर केल्या.
कार्यक्रमात रिया आणि मधुरा हिने गंभीरनातई रागावर आधारित मल्लरी, नातई महा गणपतीम, यमन कल्याणी रागावर आधारित नवकार, खंडा तालावर आधारित अलरीप्पू, मध्यमावती रागावर आधारित ब्रम्ह संधी, हमसानंदी रागावर आधारीत जतिस्वरम, रागमालिकावर आधारित शब्दम, रागेश्रीवर आधारित वरणम, भैरवी शंकर श्रीगिरी, शेंजूरुत्ती विषमकारा कन्नन, भजनी तालावर आधारित खेळ मांडीयेला, शिवरंजनी तिल्लाना, मध्यमावती मंगलमया प्रकाराचे सादरीकरण केले. ऊर्जाच्या नृत्यात ताल व सुर व पदलालित्याचा सुरेख संगम या वेळी पाहायला मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिनेत्री देविका दफ्तरदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. नृत्य प्रेरणा इंटरनॅशनल स्कूल फॉर डान्सच्या वतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.अ‍ॅड. मिनल जोशी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन सौ. गायत्री चौकसकर यांनी केले.
या कार्यक्रमात नट्टूवंगमची साथ सूचित्रा दाते व श्रुती टेकावडे, मृदंगमची साथ पी आर चंद्रन, गायनाची साथ निथी नायर, बासुरीची साथ सुनिल अवचट, व्हायोलिनची साथ बालासुब्रमन्यम सर्मा यांनी दिली. वेशभूषा के. मोहन आणि लक्ष्मी मोहन, लाइट-साऊण्ड हर्षवर्धन केतकर, कार्ड डिजायनर शिबानी चौधरी, प्रात्याक्षिक इशा जोगळेकर, समृद्धी साका आणि तन्मयी शितोळे,
अरंगेत्रम सादर करणे हे प्रत्येक नृत्य शिकणाऱ्या शिष्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा असतो. भरतनाट्यम नृत्यशैलीतील एका विशिष्ट पातळीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतरच अरंगेत्रम् सादर करण्याची परवानगी असते. यामध्ये विविध प्रकारातील नृत्यरचना सलग सादर कराव्या लागतात. त्यामुळे अनेकदा दोन-चारच्या समुहात अरंगेत्रम् सादर करण्यावर भर दिला जातो. हे नृत्य सादर करणे नृत्यांगनेच्या व गुरूच्या दृष्टीने अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा क्षण असतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading