वी फाऊंडेशन आणि एरिक्सनने वंचित विद्यार्थ्यांसाठी पुण्यामध्ये रोबोटिक लॅब केली सुरु
पुणे : चौथ्या औद्योगिक क्रांतीची नांदी सुरु झाली आहे. भविष्यातील आपले मनुष्यबळ केवळ डिजिटल युजर बनून न राहता डिजिटल मेकर बनावे यासाठी आजच्या विद्यार्थ्यांना डिजिटल कौशल्ये आत्मसात करण्यासाठी प्रोत्साहन देणे खूप महत्त्वाचे आहे. भविष्यासाठी तयार असलेले कुशल प्रतिभावंत निर्माण होण्याची सुरुवात शालेय स्तरापासूनच व्हावी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून, वी चा सीएसआर विभाग वी फाऊंडेशनने एरिक्सन इंडियाच्या सहयोगाने पुण्यातील पिंपरी – चिंचवडमधील सयाजीनाथ महाराज विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये अत्याधुनिक रोबोटिक लॅब सुरु केली आहे.
महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, कर्नाटक आणि गुजरात या सहा राज्यांमध्ये मिळून दहा रोबोटिक लॅब्स तयार करण्याचे वी फाऊंडेशनने ठरवले आहे आणि त्यापैकी पहिली लॅब आज पुण्यात सुरु करण्यात आली. या डिजिटल लॅबचे औपचारिक उद्घाटन एरिक्सनचे व्हाईस प्रेसिडेंट आणि हेड ऑफ कस्टमर युनिट, वेस्ट इंडिया अमरजीत सिंग यांनी केले. यावेळी वोडाफोन आयडिया लिमिटेडचे क्लस्टर बिझनेस हेड – महाराष्ट्र व गोवा रोहित टंडन उपस्थित होते.
वोडाफोन आयडिया लिमिटेडचे चीफ रेग्युलेटरी आणि कॉर्पोरेट अफेयर्स ऑफिसर व वी फाऊंडेशनचे डायरेक्ट पी बालाजी यांनी या उपक्रमाबाबत सांगितले, “समाजाच्या कल्याणासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग करणे हा आमच्या सामाजिक विकास उपक्रमांचा केंद्रबिंदू आहे. पुण्यामध्ये सुरु करण्यात आलेली आमची डिजिटल लॅब शालेय मुलांना कोडिंग आणि रोबोटिक्सचा अनुभव मिळवून देईल, त्यांच्यामध्ये सर्जनशीलता, समीक्षात्मक विचार यांना प्रोत्साहन देईल, त्यांच्या व देशाच्या उज्वल भवितव्याकडे घेऊन जाणारे, संधींचे खूप विशाल विश्व त्यांच्यासमोर खुले करेल.”
एरिक्सनचे व्हाईस प्रेसिडेंट, सेल्स, वेस्ट इंडिया अमरजीत सिंह यांनी सांगितले, भारतामध्ये ५जी सेवांची सुरुवात करून डिजिटल इंडिया व्हिजन साकार करण्याचा पाया घातला गेला आहे. भविष्यासाठी तयार मनुष्यबळ निर्माण करण्यात गुंतवणूक करणे हे महत्त्वाचे पहिले पाऊल आहे.
