टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझ २०२२ च्या क्लस्टर ८ च्या अंतिम फेरीत पुण्याच्या राजर्षी चंदा यांनी विजेतेपद पटकावले.
पुणे : भारतातील सर्वात प्रतिष्ठित बिझनेस क्विझ टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझ २०२२ च्या १९व्या वर्षात क्लस्टर ८ च्या अंतिम फेरीचे विजेतेपद पुण्याच्या फुजित्सु कन्सल्टिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमधील राजर्षी चंदा यांनी पटकावले आहे.
क्लस्टर ८ च्या अंतिम फेरीत अतिशय अटीतटीची स्पर्धा पाहायला मिळाली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्सचे ग्रुप हेड – ह्युमन रिसोर्स, बिझनेस एक्सेलन्स आणि चीफ एथिक्स कौन्सेलर – ऑफिस ऑफ स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट श्री. सुदिप्ता मर्जीत यांनी व्हर्च्युअल पारितोषिक वितरण समारंभात विजेत्यांना पारितोषिके दिली. भाग्यशाली विजेत्याला ३५,०००* रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. तसेच त्यांना राष्ट्रीय पातळीवरील अंतिम फेरीत पात्र ठरण्यासाठी उपांत्य फेरीत देखील भाग घेता येईल. डेसिमल पॉईंट ऍनालिटिक्सचे अबिनाश पाध्य यांनी उपविजेतेपद जिंकले असून त्यांना १८,०००* रुपयांच्या रोख पारितोषिकाने गौरवण्यात आले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझचे आयोजन ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षी देखील तीच पद्धत कायम ठेवली गेली. या स्पर्धेसाठी संपूर्ण देशभरात १२ क्लस्टर्स ठरवण्यात आले आहेत. ऑनलाईन प्रिलिमचे दोन टप्पे पार पडल्यानंतर १२ क्लस्टर्समधील १२ विजेत्यांना वाईल्ड कार्ड अंतिम फेरीसाठी निवडण्यात येईल. त्यातील ६ विजेत्यांमध्ये १२ ऑनलाईन क्लस्टर फायनल्ससाठी स्पर्धा होईल. १२ क्लस्टर अंतिम फेऱ्यांच्या विजेत्यांमध्ये उपांत्य फेरी होईल आणि सरतेशेवटी ६ विजेते राष्ट्रीय अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. राष्ट्रीय अंतिम फेरी जानेवारी २०२३ मध्ये होईल. राष्ट्रीय अंतिम फेरीच्या भाग्यशाली विजेत्याला २.५ लाख रुपयांचे महापरितोषिक आणि प्रतिष्ठित टाटा क्रुसिबल ट्रॉफी देऊन गौरवण्यात येईल. यंदाच्या वर्षी टाटा क्रुसिबल कॉर्पोरेट क्विझचे आयोजन टाटा प्ले बिंज, टाटा मोटर्स नेक्सन, टाटा वनएमजी, मिआ बाय तनिष्क आणि टाटा क्लिक यांच्या सहयोगाने करण्यात येत आहे. सर्व अंतिम फेऱ्यांचे प्रक्षेपण टाटा क्रुसिबल फेसबुक, ट्विटर आणि युट्युब चॅनेल्सवर डिफर्ड बेसिसवर करण्यात येईल.
ख्यातनाम क्विझमास्टर ‘पिकब्रेन’ गिरी बालसुब्रमण्यम यांनी आपल्या अनोख्या व कौशल्यपूर्ण क्वीझिंग शैलीमध्ये सह-सूत्रसंचालक रश्मी फुर्टाडो यांच्यासह या स्पर्धेचे सूत्रसंचालन केले.
क्विझची सर्व तपशीलवार माहिती www.tatacrucible.comवर उपलब्ध आहे.
मोबाईल ऍप: तुमच्या मोबाईल फोनवर टाटा क्रुसिबल ब्रेनबॉक्स मोबाईल ऍप डाउनलोड करा. हे ऍप आयओएस, अँड्रॉइड आणि विंडोज प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहे.
