Saturday, October 24, 2026
ENTERTAINMENTLatest News

Tu chal Pudh : शिल्पी खरंच बदलेल की हे सगळं नाटक आहे?

‘तू चाल पुढं’ मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळतायत, नुकतंच आपण पाहिलं शिल्पीचा खोटेपणाचे सत्य घरातील सर्वांसमोर आलं सर्वांनाच माहीत पडते. त्यानंतर विद्युत शिल्पीला घटस्फोटाची नोटीस पाठवतो. शिल्पी घरी तांडव करते. आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. पण मग अश्विनी तिला आणि विद्युतला समजावते. विद्युत काही ऐकायला तयार नाही. संस्क्रांतीचं हळदीकुंकु हे दरवर्षी अश्विनीकडे असतंच त्यामुळे लोकांना दाखवण्यासाठी या दु:खाच्या प्रसंगी देखील घरात हळदीकुंक करण्याचं अश्विनी ठरवते आणि या कार्यक्रमात शिल्पी आणि विद्युतला एकत्र आणण्याचं ठरवते. शिल्पी माझ्यासोबत राहायला तयार असेल तरच मी तिला माफ करेन, अशी अट विद्युत ठेवतो. त्यामुळे शिल्पीची रितसर पाठवणी केली जाते. आता शिल्पी शिल्पी खरंच बदलेल की हे सगळं नाटक आहे हे येणाऱ्या भागातच कळेल. त्यासाठी पाहायला विसरू नका ‘तू चाल पुढे ‘  सोमवार ते शनिवार रात्री ७:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading