Saturday, October 24, 2026
Latest NewsPUNE

स्वस्तिक फाऊंडेशन आणि सोलारीस क्लब तर्फे ‘सर्वांगिण विकास प्रकल्प’ सामाजिक संस्थेला पुस्तके आणि खेळणी भेट !!

पुणे :  गरजू आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांना वाचनाचा ध्यास लावत त्यांच्या आयुष्यात सुखी आणि समाधानी जीवनाची गोडी आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्वस्तिक फाऊंडेशन आणि सोलारीस क्लब तर्फे पुण्यातील ‘सर्वांगिण विकास प्रकल्प’ सामाजिक संस्थेला पुस्तके आणि खेळणी मदत म्हणून देण्यात येत मकरसंक्रांतीचा आनंद व्दिगुणीत करण्यात आला.

येरवडा येथील लक्ष्मीनगरमधील गरजू आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या मुलांसाठी काम करणार्‍या ‘सर्वांगिण विकास प्रकल्प’ सामाजिक संस्थेला ५०० हून अधिक पुस्तेक तसेच २५० हून अधिक खेळणी भेट म्हणून देण्यात आली. मकरसंक्रांतीच्या निमित्त स्वस्तिक फाऊंडेशन आणि सोलारीस क्लब यांच्यातीने कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. आर्थिकदृष्ट्या कमकूवत असल्यामुळे मुलांना त्यांचे पालक खेळणी उपलब्ध करून देऊ शकत नाही. संस्थेच्या या उपक्रमामुळे मुलांना खेळणी मिळाल्याने त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. मुलांना लहान वयातच वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने संस्थेच्यावतीने पुस्तकेही देण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे सोलारीस क्लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली, स्वस्तिक फाऊंडेशनचे अध्यक्ष सर्वेश मेहेंदळे, सुराज्य संस्थेचे संस्थापक विजय शिवले, पुष्कराज बेडेकर, सुशांत कुलकर्णी आणि लक्ष्मीनगर येथील मुले उपस्थित होती.

यावेळी मनोगत व्यक्त करताना हृषीकेश भानुशाली म्हणाले की, सोलारीस क्लब तर्फे नेहमीच सामाजिक उपक्रमांना पाठींबा दिला जातो. आम्हीसुद्धा क्लबच्या वतीने अनेक सामाजिक मदत आणि उपक्रम वर्षभरात राबवत असतो. याच हेतूने आम्ही यासुद्धा सेवाभावी कार्याला आमच्यावतीने छोटासा हातभार लावला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading