Sunday, October 25, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

चिंडवड व कसबा पेठेची विधानसभा पोटनिवडणूक जाहीर

मुंबई : चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणुक जाहीर करण्यात आली आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये 27 तारखेला ही पोटनिवडणूक होणार आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे.

कसबा विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांच काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे.  तर चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचेही काही दिवसांपूर्वी निधन झाल आहे. या दोन्ही आमदारांच्या जागी आता पोट निवडणूक घेतली जाणार आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम –

– 31 जानेवारी 2023 रोजी उमेदावारांची नामांकन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होईल.

– 7 फेब्रुवारी 2023 पर्यंत ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत

– 8 फेब्रुवारी 2023 उमेदवारी अर्जांची छाननी

– 10 फेब्रुवारी 2023 रोजी शुक्रवारी अर्ज परत घेण्याची शेवटची तारीख

– 27 फेब्रुवारी 2023 रोजी या दोन जागांसाठी मतदान

– 2 मार्च रोजी मतमोजणी होईल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading