Thursday, August 27, 2026
Latest NewsPUNE

दक्षिण पुण्यातील ड्रायव्हिंग स्कूलच्या वतीने रास्ता सुरक्षा अभियान 

पुणे : प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे शहर पोलिस, पुणे वाहतूक पोलिस व दक्षिण पुणे मोटार ड्रायव्हिंग स्कूल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यातील दत्तनगर,कात्रज भागात रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने रस्ते सुरक्षितता प्रबोधन कार्यक्रम श्री सिद्धिविनायक सांस्कृतिक हॉल,दत्तनगर कात्रज येथे  आयोजित करण्यात आला होता. 
सदर कार्यक्रमास उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, संजीव भोर , वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारती विद्यापीठ , श्रीहरी बहिरट , आरजे बंड्या, मोटार वाहन निरीक्षक अनिल खेमनर, मोटार वाहन निरीक्षक  विलास वडीतके, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक श्रीमती वृंदा मारके सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शुभम पाटील, माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे आदि उपस्थित होते
दक्षिण पुणे भागातील महेश ड्रायव्हिंग स्कूलचे  महेश शिळीमकर, भरत ड्रायव्हिंग स्कूलचे भरत गायकवाड, मेसेज ड्रायव्हिंग स्कूलचे  शेखर भोसले, स्टार ड्रायव्हिंग स्कूलचे  जावेद शेख, स्वराज ड्रायव्हिंग स्कूलचे  सचिन गुंड, राजेश ड्रायव्हिंग स्कूल चे राजेश इरकल, न्यू कैलासगिरी ड्रायव्हिंग स्कूलचे निलेश गिरी, शिळीमकर ड्रायव्हिंग स्कूल चे  सागर शिळीमकर, राधेश्याम ड्रायव्हिंग स्कूल चे  श्याम पवार, ड्राईव्ह इझी ड्रायव्हिंग स्कूल चे  कौस्तुभ राडे, कादंबरी ड्रायव्हिंग स्कूलच्या  सविता विभुते, ऋग्वेद ड्रायव्हिंग स्कूल चे हरीश यांनी सहभाग घेऊन त्यांच्या विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा बाबतीत प्रबोधन केले .मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली त्याच बरोबर लकी ड्रॉ द्वारे हेल्मेट वाटप करण्यात आले,मान्यवरांच्या हस्ते रस्ता सुरक्षा दिनदर्शिकेचे उदघाटन करण्यात आले , तसेच  एकनाथ ढोले यांच्या सौजन्याने नेत्र तपासणी शिबारचे आयोजन करण्यात आले होते मान्यवरांचे आभार प्रदर्शन  महेश शिळीमकर यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading