Wednesday, August 26, 2026
Latest NewsSports

जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा शुक्रवारपासून रंगणार

पुणे : पूना अमॅच्युअर्स संघाच्या वतीने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने सहाव्या जिल्हास्तरीय खुल्या महिला व पुरुषांच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन २० ते २२ जानेवारी दरम्यान नेहरू स्टेडियम येथे करण्यात आले असल्याची माहिती स्पर्धा आयोजक उमेश गालिंदे, सुरेश राऊत, रेखा गवईकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक पुणे महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे, माजी नगरसेवक विशाल धनवडे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष अतुल शितोळे, उद्योजक युवराज निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या स्पर्धेत मुलांचे सुमारे ४० व मुलींचे २० संघ सहभागी होणार आहे. या स्पर्धेत पुरुष व महिला गटांच्या विजेत्यांना ३१,००० हजार, उपविजेत्या संघाला २१,००० तर तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या संघाला १५,००० रोख पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे आयोजक उमेश गालिंदे यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading