पेन ड्राईव्ह प्रकरणातील ऍड. प्रवीण चव्हाण यांच्या विरुद्ध खंडणी चा गुन्हा दाखल
पुणे: जळगाव जिल्ह्यातील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को. ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील घोटाळ्यातील एका आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध न करण्यासाठी एक कोटी 22 लाख रुपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यासह तिघांवर पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ॲड. प्रवीण चव्हाण, शेखर सोनाळकर, उदय पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरज झंवर यांनी या संदर्भात डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.
याप्रकरणी सुरज सुनिल झंवर (वय ३१, रा. जळगाव) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बीएच आरच्या गुन्ह्यात सुनिल झंवर यांना जामीन मिळण्याकामी सहकार्य करेन. पैसे दिले नाही तर तुन्हा दोघांना नुकसान पोहचवेल. जामीन मिळवून देणार नाही. तसेच कोथरुडमधील गुन्ह्यात फिर्यादी यांना अडकविण्याची धमकी देऊन २ कोटी रुपयांची मागणी केली. त्यातील १ कोटी रुपये चव्हाण यांनी स्वत:कडे ठेवले व २० लाख रुपये उदय पवार याने मध्यस्थ म्हणून स्वत:साठी घेतले व २ लाख रुपये हवाल्याच्या मोबदला म्हणून चाळीसगाव येथील ओरिजनल वाईन शॉप येथे २६ नोव्हेबर २०२१ रोजी घेतले. तसेच जामिनासाठी मदत केली नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
