Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

पुण्यातील वास्तुकलेचा इतिहास सांगणारे ‘इनसाईट वास्तुकला प्रदर्शन’

पुणे : निओ गॉथिक शैलीतील बांधकामाचा उत्तम नमुना असणारे पुण्यातील महात्मा फुले मंडई….पुण्यातील महत्त्वाचे व्यापारी क्षेत्र असणाऱ्या मार्केट यार्डची रचना…गॉथिक शैलीतील सेंट पॉल चर्च अशा पुण्यातील वास्तुकलेचा इतिहास सांगणाऱ्या रचना आणि देशातील वैशिष्टयपूर्ण ठिकाणचा अभ्यास करुन साकारलेल्या कलात्मक रचना इनसाईट २०२२ या वास्तुकलाप्रदर्शनात पाहण्याची संधी उपस्थितांना मिळाली.

पी. व्ही.पी. वास्तुकला महाविद्यालयाच्या ‘इनसाईट २०२२’ या वास्तुकला प्रदर्शनाचे आयोजन महाविद्यालयाच्या पिरंगुट संस्थेच्या कॅम्पसमध्ये करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभेपाटील व चित्रपट निर्माते अणि समीक्षक समर नखाते यांच्या हस्ते झाले. यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील उपअभियंता बापूसाहेब गायकवाड, व्हिआयटी संस्थेचे अध्यक्ष अभय छाजेड, विश्वस्त विकास भंडारी, सचिव जितेंद्र पितळिया , प्राचार्य आर्कि. प्रसन्न देसाई अणि शैक्षणिक समन्वयक आर्कि.शेखर गरुड उपस्थित होते.

समर नखाते म्हणाले, वास्तुकला अणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात साम्य आहे. या दोन्ही क्षेत्रात दृश्य अणि अवकाश स्वरुपात होणारा समतोल अणि सुसंवाद यावर भाष्य केले जाते. वेळ अणि अवकाश हे व्यक्तिनिष्ठ अणि सापेक्ष आहेत ज्याचा संबंध वास्तुकला अणि सिनेमा या दोन्ही माध्यमातून दिसतो. मानवी संवेदना अणि मानवी वृत्ती यावर भाष्य करणारे दोन लघु पट दाखवत, विद्यार्थ्यांना आपल्या भावी कार्यक्षेत्रात, बांधकामाच्या पलीकडे जाऊन, संवेदनशील वस्तू निर्मिती करण्यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिले.

कागदी कप पासून बनवलेले, छतावर लटकवलेले म्युरल तसेच ओरीगामी पद्धतीने केलेल्या कलाकृती प्रदर्शनात बघण्यासारख्या आहेत. आठवी ते बारावी पर्यंतच्या ,ज्या विद्यार्थ्यांना वास्तुकलेचा अभ्यासक्रमात रुची आहे आणि त्यांना वास्तुकलेविषयी अधिक जाणून घेण्यात रूची आहे, त्यांना या प्रदर्शनात संपूर्ण माहिती विनामूल्य मिळेल. वास्तू तंत्रज्ञान, वास्तुकलेचा इतिहास, अर्बन डिझाईन, लॅंडस्केप डिझाईन इत्यादी विषयांवरील अतिशय सुंदर प्रकल्प विद्यार्थ्यांनी साकारले आहेत. शैक्षणिक वर्षात चांगली कामगिरी करणार्‍या विद्यार्थ्यांचे, मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन समान करण्यात आला. प्रदीप जांभेपाटील, संस्थेचे अध्यक्ष अभय छाजेड यांनी मनोगत व्यक्त केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading