Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी मुस्लिम राष्ट्रीय मंच काम करेल – इरफानअली पिरजादे

पुणे – तळागाळातील लोकांच्या उन्नतीसाठी मुस्लिम राष्ट्रीय मंच काम करेल असे राष्ट्रीय संयोजक इरफानअली पिरजादे यांनी आझम कॅम्पस येथे झालेल्या बैठकीत सांगितले आहे.

यावेळी पिरजादे म्हणाले की, मुस्लिम राष्ट्रीय मंच समाजातील प्रमुख लोकांना जोडून आम्ही काम करत आहोत त्याचबरोबर तळागाळात लोकांपर्यंत पोहचण्यासाठी विभागावर बैठक घेऊन प्रमुख कार्यकत्यांच्या माध्यमातून लोकांना जोडण्याचे काम आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर आज तरुणांमध्ये अंमली पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणावर वाढले आहे ते रोखण्यासाठी अंमली पदार्थ विरोधी करण्यासाठी माहे. फेब्रुवारी महिन्यात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तर सन 2023 – 24 च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा प्रखर पणे यावा म्हणून सर्व आमदारांना लेखी निवेदन देण्याचे कार्यक्रम आम्ही आखत आहोत. केंद्र व राज्य सरकारच्या अल्पसंख्याक विभागाची माहिती मस्जिद च्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहचवावे. उच्च शिक्षकीत बेरोजगार तरुण – तरुणींसाठी रोजगार मेळावा घेणे, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या सहकारी आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान करणे, आदी कार्यक्रम आयोजित केले आहे.

या बैठकीत मुस्लिम राष्ट्रीय मंच राष्ट्रीय संयोजक इरफानअली पिरजादे, विराग पाचपोर, पश्चिम क्षेत्र संयोजक जावेद अन्सारी, कोकण प्रांत संयोजक मुस्ताक शेख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक ताहेर असी, कोकण प्रांत महिला संयोजक ऍड. आयेशा सय्यद, पश्चिम महाराष्ट्र महिला संयोजक रेश्मा पठाण, नागपूर महानगर संयोजक शारीक शेख, मुंबई महानगर संयोजक शकील हिंदुस्तानी आदी महाराष्ट्र भरातून पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading