चिमुकल्यांनी केले चीनी मांजा न वापरण्याचे आवाहन
बुधवार पेठ येथील साईनाथ मंडळ ट्रस्टच्या वतीने संक्रांतीनिमित्त चीनी मांजा न वापरण्याची शपथ – बालचमुंच्या रूपात मांजा मध्ये अडकलेल्या प्रतिकात्मक पक्ष्यांचे सादरीकरण
पुणेः मकर संक्रांतीला लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पतंग उडवण्यासाठी वाट पाहत असतात. संक्रांतीच्या काळात आकाश रंगीबेरंगी पतंगांनी भरुन जातं. मात्र बाजारात जेव्हापासून चायनीज मांजा आला तेव्हा पासून पशु पक्षांसह नागरिकांनीही प्राण गमावल्याच्या घटना घडल्या आहेत. मोकळया आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांचा जीव घेवू नका… पतंग उडवू नका, आम्हाला जगू द्या… आम्हाला उडू द्या…चायनीज मांजाचा वापर करू नका… जीवीत हानी करून नका… असा संदेश कावळा, चिमणी, पोपट, घार, मोर झालेल्या बालचमूंनी दिला.
बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट ट्रस्टच्यावतीने शनिवार पेठेतील वर्तक उद्यानात व विसर्जन घाटावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मकरसंक्रांतीनिमित्त पतंग न उडविण्याचे, तसे चायनीज मांजा न वापरण्याचे आव्हान यावेळी करण्यात आले. यावेळी पक्षी प्रेमी …. यांनी नुकत्याच मांजामुळे जखमी झालेल्या एका घारीला दाखवून नागरीकांना पतंग न उडविण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाचे आयोजन मंडळाचे अध्यक्ष पियुष शहा यांनी केले होते, पक्षी मित्र बाळासाहेब ढमाले, नंदकुमार ओव्हाळ, नरेंद्र व्यास, गंधाली शहा, रामभाऊ दहाड, किरण सोनिवाल, संदीप लचके तन्वी ओव्हाळ, समीक्षा सोनवणे, तेजल जोशी, उमेश सपकाळ, हर्षित दोषी, दीप्ती विसाळ, आदी उपस्थित होते.
