Tuesday, June 16, 2026
BusinessLatest News

वॉर्डविझार्डतर्फे अत्याधुनिक आणि वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर ‘मिहोस’ लाँच

ग्रेटर नॉयडा, – शाश्वतता आणि हरित वाहतूक क्षेत्रात मोठी झेप घेत वॉर्डविझार्ड या आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी जॉय ईबाइकच्या उत्पादक कंपनीने आज ‘मिहोस’ ही नवी, वेगवान इलेक्ट्रिक स्कूटल लाँच केली आहे. रायडर्सना जास्तीत जास्त टिकाऊपणा मिळवून देण्यासाठी या गाडीत Poly Dicyclopentadiene Material (PDCPD) वापरण्यात आले आहे.

वॉर्डविझार्डच्या वडोदरा येथील आर अँड डी टीमने तयार व विकसित केलेली मिहोस ही रेट्रो स्टाइलची इलेक्ट्रिक स्कूटर आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आलेल्या या गाडीची सर्व वैशिष्ट्ये ग्राहकस्नेही असून रस्त्यावर रायडरच्या अधिक सुरक्षिततेसाठी त्यात व्हिईकल साउंड स्टिम्युलेटर देण्यात आला आहे. त्याशिवाय गाडी आरामात चालवता यावी यासाठी रूंद सीटही देण्यात आली आहे.

गाडीचे उत्पादन कंपनीच्या वडोदरा, गुजरात येथील आधुनिक उत्पादन कारखान्यात होणार असून त्याचे वितरण देशभरात टप्प्याटप्प्याने केले जाईल.

या लाँचप्रसंगी कंपनीच्या भविष्याविषयी वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक  यतिन गुप्ते म्हणाले, ‘देशातील पहिल्या काही इलेक्ट्रिक मोबिलिटी कंपन्यांपैकी एक या नात्याने आम्ही भविष्यातील पिढ्यांसाठी शाश्वत पर्यावरण आणि हरित पृथ्वी उभारण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमचे नवे उत्पादन मिहोस ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षा आणि मागण्या लक्षात घेऊन तयार व विकसित करण्यात आले आहे. ही स्कूटर ग्राहकांना तिची आधुनिक वैशिष्ट्ये रेट्रो रूपाने आकर्षित करेल, शिवाय वेगवेगळ्या प्रकारच्या रस्त्यांवर जास्त आरामदायीपणा व सुरक्षितता देईल. समग्र ई- मोबिलिटी यंत्रणा तयार करण्यासाठी कंपनी सातत्याने आर अँड डीमध्ये गुंतवणूक करत आहे आणि देशात हरित वाहतुकीचा अवलंब आणि विस्तार वाढावा यासाठी भारतातील पहिले ईव्ही अँक्सिलियरी क्लस्टर उभारत आहे. २०२३ चे वर्ष देशात ईव्ही वाहतूक प्रस्थापित महत्त्वाचे ठरेल.’

इलेक्ट्रिक मोटरसायकल विभागातील उत्पादन श्रेणी आणखी बळकट करण्याच्या हेतूने कंपनीने एक्स्पोमध्ये रॉकफेलर ही शहरी इलेक्ट्रिक मोटरसायकलची संकल्पना लाँच केली. ही कॉन्सेप्ट मोटरसायकल चालकाच्या दैनंदिन प्रवासाच्या गरजा लक्षात  घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष २४ च्या अखेरपर्यंत ही मोटरसायकल लाँच करण्याचे कंपनीचे नियोजन आहे.

 

मिहोसची वैशिष्ट्ये – मिहोस ही रेट्रो स्टाइलची इलेक्ट्रिक क्लासिक स्कूटर चालकाचा आरामदायीपणा लक्षात घेऊन तयार करण्यात आली असल्यामुळे कोणत्याही वयोगटाच्या चालकासाठी उत्तम आहे.

 

  • ७५० मिमी उंची असलेली रूंद आणि लांब सीट, १३६० मिमीचा विस्तारित व्हीलबेस
  • आरामदायीपणासाठी – लांबी = १८६४ मिमी | रूंदी = ७०० मिमी | उंची = ११७८ मिमी.
  • आरामदायीपणा लक्षात घेऊन गाडीच्या पुढच्या बाजूस टेलिस्कोपिक सस्पेन्शन आणि मागच्या बाजूस मोनो रिव्हर्सिबल स्प्रिंग सस्पेन्शन देण्यात आले आहे.
  • मिहोसची रचना भारतीय रस्ते लक्षात घेऊन केलेली असल्यामुळे त्याचा ग्राउंड क्लियरन्स १७५ मिमी आहे.
  • गाडीमध्ये साइड स्टँड सेन्सर आणि हायड्रोलिक कॉम्बी ब्रेक सिस्टीम (सीबीएस) अशी सुरक्षेची अतिरिक्त वैशिष्ट्ये देण्यात आली आहे.
  • मिहोसमध्ये Poly Dicyclopentadiene किंवा PDCPD हे अनोखे साहित्या वापरण्यात आले आहे. यामुळे हे उत्पादन इतरांपेक्षा वेगळे, जास्त लवचिक आणि तरीही दणकट ठरते.
  • मिहोस सात सेकंदांपेक्षा कमी कालावधीत ०-४० किमीचा वेग गाठत असून त्याचा टॉर्क ९५ एनएम आहे.
  • CAN-आधारित बुद्धीमान इलेक्ट्रॉनिक्स

बॅटरी तंत्रज्ञान – मिहोसमध्ये 74V40Ah Li-Ion बॅटरी निकेल मँगेनीज कोबाल्ट केमिस्ट्री देण्यात असून त्याची उर्जा २.५ kWh आहे. बॅटरीमध्ये धक्के सहन करण्याची चांगली क्षमता असून टिकाऊपणासाठी ती विविध प्रकारच्या कठोर निकषांतून यशस्वीपणे तावूनसुलाखून निघालेली आहे. त्यामध्ये सेफ्टी सेन्सर्सची मोठी श्रेणी देण्यात आली आहे, की करंटपासून संरक्षण आणि थर्मल कट- ऑफची सुविधा देते. भारतीय हवामान लक्षात घेऊन ही वैशिष्ट्ये तयार करण्यात आली आहेत.

 

बॅटरी हे इलेक्ट्रॉनिक वाहनाचे हृदय असते. चांगल्या कामगिरीसाठी यात एनएमसी बॅटरी बसवण्यात आली आहे. एनएमसी हाय एनर्जी डेन्स्टी आणि दीर्घकालीन आयुष्य यांमुळे भारतीय बाजारपेठेसाठी योग्य आहे.

बुद्धीमत्ता: स्मार्ट मिहोस ई- स्कूटरमध्ये वेगवेगळ्या व बुद्धीमान सेन्सर्सचे समीकरण देण्यात आले आहेजे जास्त सुरक्षा व उपयुक्तता मिळवून देते.

  • स्मार्ट कनेक्टिव्हिटी – जॉय ई- कनेक्ट अप हे मिहोस कनेक्टसाठी एका टॅपमध्ये वापरता येणारे असून ब्लूटुथच्या मदतीने स्कूटर नियंत्रित करण्यासाठी वापरता येऊ शकते.
  • रिमोट अप्लिकेशन्स – स्कूटर आणि बॅटरीचे स्टेटस कुठूनही तपासता येऊ शकते.
  • रिव्हर्स मोड – यामुळे अवघड पार्किंगच्या जागी स्कूटर सहजपणे मागे घेता येते.
  • जीपीएस अनेबल्ड – मिहोसमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या इतर वैशिष्ट्यांमध्ये जीपीएस सेन्सिंगरियल टाइम पोझिशन आणि जिओ फेन्सिंग यांचा समावेश आहे.
  • अँटीथेफ्ट – पार्क केलेल्या मिहोसमध्ये काही छेडछाड केली जात असल्यास व्हायब्रेशन्स तयार होतात. असा परिस्थितीत गाडी स्मार्ट रिमोट कंट्रोलच्या मदतीने कुठूनही लॉक करता येऊ शकते.
  • रिजनरेटिव्ह ब्रेकिंग – यातील रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम प्रत्येक वेळेस ब्रेक लिव्हर ओढल्यानंतर बॅटरी रिचार्ज करते व गाडीचा पल्ला वाढतो.

                

कामगिरी : हब मोटरमुळे बीएलडीसी मोटर बीएलडीसी मोटर पॅकसह या विभागातील सर्वोत्तम टॉर्क देते. त्याशिवाय तीन स्पीड कंट्रोलरमुळे स्कुटरचची व्यवहार्यता वाढली आहे.

  • १५००वॉट मोटर, ९५ एनएम टॉर्क, ७० किमीचा सर्वाधिक वेग
  • युजरची सुरक्षितता वाढवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक ब्रेकिंग सिस्टीममध्ये ट्विन डिस्क ब्रेक्स देण्यात आले आहेत, जे गाडीला शक्य तितक्या कमी अंतरावर थांबवतात.
  • बॅटरीचे रेटिंग 74V40Ah आहे.
  • एक चार्जिंग चार तासांत पूर्ण होते.
  • प्रती चार्जिंगमध्ये १०० किमीचा पल्ला गाठला जातो.

किंमत आणि रंग

 

मॉडेल रंगाचे पर्याय किंमत एक्स शोरूम (पॅन भारत)
मिहोस ·         मेटॅलिक ब्लू

·         सॉलिड ब्लॅक ग्लॉसी

·         सॉलिड यलो ग्लॉसी

·         पर्ल व्हाइट

 

रू. १,४९,०००

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading