Saturday, October 24, 2026
Latest NewsPUNE

Pune : गोल्फ चौकातील उड्डाणपुलाचे उद्या लोकार्पण

पुणे : येरवड्यातील गोल्फ चौक येथील ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उड्डाणपुला’चे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी (14 जानेवारी) दुपारी 2.00 वाजता करण्यात येणार आहे.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. ही माहिती भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविली आहे.

मुळीक म्हणाले ‘नगर रस्त्यावर गुंजन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, शास्त्रीनगर या भागात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. त्यामुळे सातत्याने होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन करण्यात आले होते. स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष योगेश मुळीक यांनी या प्रकल्पासाठी 28 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यांच्या प्रयत्नातून या उड्डाणपुलाचे काम झाले आहे.’

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading