Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

देशभरात होत असलेल्या अन्याय – अत्याचाराच्या निषेधार्थ ख्रिस्ती समाजाचा भव्य मूक महामोर्चा

पुणे : .देशभरात ख्रिस्ती समाजावर अन्याय अत्याचार होत आहेत ,चर्च वर हल्ले होत आहेत याचा निषेध करण्यासाठी पुणे शहर ,पिंपरी चिंचवड ,ग्रामीण भागातील ख्रिस्ती समाज आज रस्तावर उतरला होता .. भव्य मूक महामोर्चा चे आयोजन करण्यात आले होते .या मोर्चात सर्व ख्रिस्ती पंथ कॅथोलीक, प्रॉटेस्टंट ,सी.एन.आय ,मेथडिस्ट सह सर्व पंथ सहभागी झाले होते .
हा मोर्चा सिटी चर्च नाना पेठ येथून संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून सुरुवात करण्यात आली . जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे या मोर्चाचा समारोप करण्यात आला .यावेळी जिल्हाधिकारी यांना ख्रिस्ती समाजाच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले .या मोर्चात वंचित बहुजन आघाडीच्या अंजलीताई प्रकाश आंबेडकर ,धर्मगुरू निकाळजे ,काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे ,माजी आमदार मोहन जोशी , रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे,माजी नगरसेविका अश्विनी लांडगे ,भीम आर्मी प्रदेशाध्यक्ष दत्ता पोळ,अंजुम इनामदार मोर्चाचे समन्वयक प्रशांत केदारी यासह पुणे शहरातील विविध पक्ष ,संघटना ,ख्रिस्ती पंथ ,संघटना व नागरिक हजोरींच्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading