Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

अखिल भारतीय युवक मराठा महासंघ तर्फे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन

अखिल भारतीय युवक मराठा महासंघ, पुणे शहर तर्फे दरवर्षीप्रमाणे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रसिद्ध निवेदक अभिनेते संदिपजी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी संदिपजी पाटील यांनी आजच्या नव्या पिढीला व महिलांना राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या विचारातून प्रेरणा घेऊन ते अंगिकारावे असे आवाहन केले.
यावेळेस अखिल भारतीय मराठा महासंघाचे युवक अध्यक्ष युवराज दिसले, उपाध्यक्ष सुनिल पवार,सरचिटणीस गणेश मापारी, महिलाध्यक्ष श्रुतिका पाडळे, भाग्यश्री बोरकर, सुवर्णा भरेकर, सुधा पाटील, वैशाली सोनावणे, सम्राज्ञी तावरे, सुशिल पवार, अँड. सिद्धार्थ जाधव, नितीन भरम, अनिकेत भगत, राकेश रेपाळे ,तुषार पवार, आकाश भालेराव, स्वरूप जगताप उपस्थित होते. यावेळी असंख्य शिवप्रेमी उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading