चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लहू बालवडकर यांच्या दिनदर्शिकाचे प्रकाशन
पुणे – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल समाजसेवक आणि भाजपचे युवा नेते लहु बालवडकर यांच्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकाचे प्रकाशित करण्यात आले. लहु बालवकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बालेवाडीत “चैतन्यस्पर्श” या भजन पुरूष स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिनदर्शिकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड आणि पुणे शहारातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लहु बालवडकर सोशल वेलफेअरच्या माध्यमातून लहू बालवडकर यांनी मागील वर्षात अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्याचा आढावा देखील या दिनदर्शिकेत घेण्यात आला आहे. यामध्ये चैतन्यस्पर्श पादुका दर्शन सोहळा, मागील ७ वर्षापासून बालेवाडीकरांच्या सेवेत अखंड चालु असणारा आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवलेला शेतकरी आठवडा बाजार असो किंवा कोरोना काळात मदतीचा दिलेला हात, मोफत आरोग्य शिबीर, मोफत स्मार्ट कार्ड सुविधा केंद्र, मोफत लसीकरण अभियान, आरोग्याची वारी, पंढरीची वारी यांचा उल्लेख करण्यात आला आहे.
त्याचबरोबर देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असतांना आणि आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा, अटल संपर्क अभियान, यशश्री स्पर्धा संकल्प अभियान, सुर संध्या, क्रिडा स्पर्धांचे आयोजन, इत्यादींचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात लहू बालवडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लहू बालवडकर सोशल वेलफेअरकडून “चैतन्यस्पर्श” या अलौकिक सोहळ्याचे तसेच भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. चैतन्यस्पर्श या सोहळ्याच्या निमित्ताने पुणे जिल्ह्यातील हजारो भाविकांनी भारतातील १३ शक्तीपीठांमधील संत आणि देवतांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेतला. अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला. अंदाजे १८ ते २० हजार भाविकांनी यावेळी या अद्भुत सोहळ्याला हजेरी लावली तसेच जवळ पास पंधरा हजार भक्तीनी महाप्रसादाचा लाभ घेतला. 8 तास चाललेल्या या सोहळ्यानंतर संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास महाआरती झाली यावेळी प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. या सोहळ्याच्या निमित्ताने अवघा बालेवाडी परिसर भक्तिरसात नाहून निघाला. यावेळीच या दिग्दर्शिकीचे प्रकाशन करण्यात आले.
