Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

मोझे प्रशाला, अभिनव विद्यालयाला विजेतेपद

पुणे : मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या मनातील इंग्रजी भाषेचा न्यूनगंड दूर करण्यासाठी श्रीकांत भावे स्मृती करंडक इंग्रजी संवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत छोटया गटात येरवडा येथील गेनबा सोपानराव मोझे प्रशाला तर मोठ्या गटात कर्वे रस्त्यावरील मराठी माध्यमाचे अभिनव विद्यालय हायस्कूल यांनी विजेतेपद पटकावले आहे.

नातूबाग परिसरातील आदर्श शिक्षण मंडळी, माजी विद्यार्थी संघटनेतर्फे दरवर्षी श्रीकांत भावे स्मृती करंडक ‘इंग्रजी संवाद स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे मानद कार्यवाह प्रकाश जोशीराव यांच्या हस्ते झाले.

स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात खडक पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक संगीता यादव, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे यादव, पुणे शहर पोलिस विघ्नहर्ता न्यासचे विश्वस्त राजाभाऊ कदम, स्पर्धा प्रमुख प्रशांत मते, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संदीप गायकवाड, डी.पी.जोशी, रेखा मोरे, शिरीष मोहिते, सारिका सणस, अंजली धुमाळ, नयना नाईक, राधिका नगरे, किरण रासकर, नितीन होले, वंदना भावे, देवेंद्र भावे, राजेश पारखे, राहुल निगडे, नितिन मखी, अब्दुल मुल्ला, हेमंत भामे आदी उपस्थित होते. मंजुषा पुराणिक व मुग्धा महादेवकर यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. स्पर्धेचे यंदा ११ वे वर्ष होते. स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले.

संगीता यादव म्हणाल्या, यश अपयशाचा विचार करू नका, स्पर्धेत नेहमी भाग घेत रहा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेत भाग घ्या, असे मार्गदर्शन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. अरुण पटवर्धन व आनंद आंबेकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत मते यांनी आभार मानले. स्पर्धेत यंदा ५० हून अधिक संघ सहभागी झाले तर अपंग विद्यार्थ्यांचे ३ संघ व अंध विद्यार्थ्यांचा १ संघाचा विशेष सहभाग होता.

गेनबा सोपानराव मोझे प्रशाला, येरवडा व अभिनव विद्यालय हायस्कूल, मराठी माध्यम, कर्वे रस्ता विजेतेपद

  • गट इयत्ता ५वी ते ७वी – १) गेनबा सोपानराव मोझे प्रशाला, येरवडा २) अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स ३) सुंदराबाई मराठे विद्यालय, खराडी उत्तेजनार्थ : एच. एच. सी. पी. हुजूरपागा लक्ष्मी रोड, उत्तेजनार्थ उपनगर : सयाजीनाथ महाराज विद्यालय, आळंदी, अभिनय : अथर्व बनकर ( ग.रा. पालकर प्राथमिक शाळा, कर्वेनगर) लेखन: सोनल सोनवणे (गेनबा सोपानराव मोझे प्रशाला, येरवडा) दिग्दर्शन : दिपाली जमदाडे (अभिनव विद्यालय हायस्कूल, कर्वेनगर)
  • गट ८वी ते १०वी – १) अभिनव विद्यालय हायस्कूल, मराठी माध्यम, कर्वे रस्ता २) माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालय ३) सुंदराबाई मराठे विद्यालय खराडी, पुणे उत्तेजनार्थ : हुजूरपागा कात्रज माध्यमिक विद्यालय उत्तेजनार्थ उपनगर : सयाजीनाथ महाराज विद्यालय, आळंदी अभिनय : सुजल दास (श्री रामराज्य माध्यमिक विद्यालय इंदिरानगर) लेखन: सारिका अल्हाट (आदर्श विद्यालय मुलींचे हायस्कूल) दिग्दर्शन : वर्षा कुलकर्णी (अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्स, शनिवार पेठ )

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading