fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

जी 20 परिषदेपूर्वी SSPU किवळे येथे चर्चा सत्रांचे आयोजन

पुणे : २०२३ सालच्या जी 20 चे अध्यक्षपद भारताकडे असून या पार्श्वभूवर सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (SSPU), किवळे आणि पुणे महानगरपालिका यांच्या सौजन्याने विविध कार्यक्रमांचे आयोजन किवळे येथे करण्यात आले होते. ह्यामध्ये प्रामुख्याने वक्तृत्व स्पर्धा, सिंबि जी 20 प्रश्नमंजुषा स्पर्धा, शोधनिबंध सादरीकरण स्पर्धा तसेच विविध चर्चा सत्रांचा समावेश होता.

भारताच्या जी20 अध्यक्षकाळाची संकल्पना ही “वसुधैव कुटुंबकम” वर आधारित आहे. ह्या अनुशंगाने भारत ३२ वेगवेगळ्या कार्यप्रणालीशी संबंधित ५० हून अधिक शहरांमध्ये २०० हून अधिक बैठकांचे आयोजन करणार आहे त्यातील शिक्षण विषयक बैठकीच्या पार्श्वभूमीवर सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी तर्फे विविध स्पर्धा आणि चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते.

सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी च्या प्र-कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार सदरील उपक्रमाविषयी म्हणाल्या की , “शिक्षण आणि कौशल्य विकास हे आपल्या देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना देणारे आधारस्तंभ आहेत. विविध विषयावर विचारपूर्वक चर्चा करणे महत्त्वाचे आहे आणि त्याचीच चर्चा येथे करण्यात येत आहे. जी 20 परिषदेमध्ये कौशल्य विकासावर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे. स्किल इंडिया हा महत्वपूर्ण घटक आहे. जो मेक इन इंडिया ला प्रोत्साहित करतो.” त्या पुढे म्हणाल्या की स्थानिक समस्या सोडवण्यासाठी तरुणांना सहभागी करून घेतले पाहिजे आणि सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी नेहमीच प्रयत्नशील असतात.

ह्या दरम्यान आयोजित चर्चा सत्रांमध्ये क्रेडाईचे आगामी अध्यक्ष रणजित नाईकनवरे, महा मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे, स्मार्ट सिटी पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते, फर्निचर आणि फिटिंग सेक्टर कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी,  राहुल मेहता, फियाट इंडिया चे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश बावेजा, कॅपजेमिनी च्या धनश्री पागे आणि सिंबायोसिस स्किल्स अँड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी च्या प्र-कुलपती डॉ स्वाती मुजुमदार ह्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. ह्यावेळी आयोजित मॉक चर्चेमध्ये विद्यार्थांनी जी २० मधील देशांचे नेतृत्व करत चर्चा सत्रात सहभाग नोंदवला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading