CYIENT DLM लिमिटेडचा डीआरएचपी सेबी कडे सादर
एक अग्रगण्य इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग सर्व्हिसेस Cyient DLM (“EMS”) आणि मूल्य साखळी आणि उत्पादनाच्या संपूर्ण प्रक्रियाचक्रामध्ये मजबूत क्षमता असलेल्या सुविधा पुरवठादारांनी आपले ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (“DRHP”) मार्केट रेग्युलेटर सिक्युरिटीज आणि एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (“सेबी”)कडे दाखल केले आहे. कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्रीमध्ये एकूण ७,४००.०० दशलक्ष रुपयांपर्यंतच्या फ्रेश इश्यूचा समावेश आहे.
बुक रनिंग लीड मॅनेजर्सशी सल्लामसलत करून Cyient DLM विशिष्ट सिक्युरिटीजच्या पुढील इश्यूचा विचार करू शकते. त्यात खाजगी प्लेसमेंट, राईट इश्यू, प्राधान्य ऑफर किंवा इतर कोणत्याही पद्धतीचा समावेश आहे. कंपनीच्या रजिस्ट्रारकडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस दाखल करण्यापूर्वी १,४८० दशलक्ष रुपयांपर्यंतच्या रक्कमेकरता लागू कायद्यांनुसार परवानगी असेल.
प्राथमिक समभाग विक्री द्वारे उभारलेला निधी वाढीव भांडवली गरजा, भांडवली खर्च, कर्ज परतफेड/मुदतपूर्वफेड, संपादनाद्वारे इनऑर्गनिक वाढ साध्य करण्यासाठी तसेच सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे.
दोन दशकांहून अधिक काळ Cyient DLM एक विश्वासार्ह उत्पादन भागीदार आणि प्रणाली पुरवठादार असून एरोस्पेस आणि संरक्षण, वैद्यकीय तंत्रज्ञान आणि औद्योगिक क्षेत्रातील जागतिक OEM साठी हाय मिक्स, कमी-ते-मध्यम व्हॉल्यूम अत्यंत जटिल प्रणाली विकसित करत आहे. ही कंपनी भारतातील काही मोजक्या EMS कंपन्यांपैकी एक आहे जी अत्यंत नियमन केलेल्या उद्योगांना सेवा पुरवते आणि भारतात मूल्यानुसार एरोस्पेस आणि संरक्षण उद्योगांना EMS सेवांची सर्वात मोठी पुरवठादार आहे. Cyient DLM प्रमोटर Cyient लिमिटेडच्या डिझाइन क्षमतांचा लाभ घेते. ही एक अग्रगण्य अभियांत्रिकी सेवा आहे जी जागतिक स्तरावर अनेक उद्योगांवर लक्ष केंद्रित करून अभियांत्रिकी आणि डिझाइन सुविधा पुरविण्यात तीन दशकांहून अधिक काळ डोमेन कौशल्य प्रदान करते
ग्राहकांना डिझाइन एलईडी मॅन्युफॅक्चरिंग (DLM) सोल्यूशन्स पुरवणारे एकात्मिक उत्पादन भागीदार म्हणून ग्राहकांची उत्पादने विश्वासार्हता, सुरक्षितता आणि कामगिरी तसेच बाजारपेठेत वेगात पोहोचणे साध्य करणे यांत मजबूत मानकांची पूर्तता करतात याची खात्री करण्यासाठी कंपनी डिझाइन, उत्पादन, चाचणी आणि सर्टिफिकेशन पाठबळ यांची जबाबदारी घेते. Cyient DLM ने हनीवेल इंटरनॅशनल इंक. (“हनीवेल”) सह थेल्स ग्लोबल सर्व्हिसेस S.A.S (“थेल्स”), एबीबी इंक, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड आणि मोल्बियो डायग्नोस्टिक्स प्रायव्हेट लिमिटेड अशा अनेक महत्वाच्या ग्राहकांसाठी एकात्मिक भागीदार म्हणून दीर्घकालीन संबंध प्रस्थापित केले आहेत.
Cyient DLM कडे हैदराबाद, बेंगळुरू आणि म्हैसूर येथे तीन अत्याधुनिक उत्पादन सुविधा केंद्रे असून एकूण उत्पादन क्षेत्र २२९,०६१ चौरस फूट आहे.
अॅक्सीस कॅपिटल लिमिटेड आणि जेएम फायनान्शियल लिमिटेड हे इश्यूसाठीचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स आहेत.
