Saturday, October 24, 2026
Latest NewsPUNE

कोरोनाकाळातील सेवाकार्याबद्दल सारंग सराफ यांचा सन्मान

मुख्यमंत्री कार्यालयाकडून सन्मानपत्र प्रदान

पुणे : कोरोना महामारीच्या काळात समाजातील विविध घटकांना सर्वतोपरी वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत राहणारे सारंग सराफ यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री कार्यालयाने घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख तथा विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे यांनी त्यांना कृतज्ञता पत्र दिले.

यावेळी प्रशांत तळेकर, गणेश पायगुडे हे उपस्थित होते. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष आणि डाॅ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्याकडून सराफ यांनी केलेल्या सेवाकार्याची दखल घेण्यात आली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading