रितेश -जिनिलीयाला ‘वेड’ लावणाऱ्या प्रेमाची 20 वर्ष
‘तुझे मेरी कसम’ ते ‘वेड’ पर्यंतचा 20 वर्षांचा प्रवास
महाराष्ट्राची लाडकी जोडी रितेश -जिनिलीया देशमुख यांच्या ‘ऑनस्क्रीन जोडी’ला आज 20 वर्ष पूर्ण होत आहे. तुझे मेरी कसम या हिंदी चित्रपटातपासून सुरू झालेला त्यांचा हा ऑफस्क्रीन प्रवास आज देखील ‘लय भारी’ असून समस्त महाराष्ट्राला ‘वेड’ लावत आहे. आजाच्याच दिवशी 3 जानेवारी 2003 ला ‘तुझे मेरी कसम’ हा चित्रपट रिलीज झाला होता. याच चित्रपटाच्या शुटींगसाठी रितेश -जिनिलीया पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. तो 24 वर्षांचा तर ती 16 वर्षांची. तो महाराष्ट्राच्या मुंख्यमंत्र्यांचा मुलगा तर ती मध्यमवर्गीय ख्रिच्चन कुटूंबातील मुलगी.
‘तुझे मेरी कसम’च्या सेटवर त्यांची मैत्री झाली आणि ते एकमेकांना डेट करू लागले. शुटींग संपल्यानंतरही ते एकमेकांना भेटत होते. त्यानंतर दोघांनीही आपल्या करीयरवर लक्ष केंद्रीत केलं. जिनीलियाने साऊथमध्ये तर रितेश ने बॉलीवूडमध्ये अनेक चित्रपटात काम केल. दारम्यानच्या काळात रितेश -जिनिलीयाने 2004 मध्ये ‘मस्ती’ आणि 2012 साली ‘तेरे नाल लव हो गया’ या दोन चित्रपटात एकत्र काम केल. आणि तब्बल 10 वर्षांच्या डेटींग नंतर दोघांनीही 3 फेब्रुवारी 2012 मध्ये त्यांनी लग्न केलं. आधी ख्रिच्चन व नंतर महाराष्ट्रीयन पद्धतीने त्यांच लग्न झालं.
त्यानंतरच्या काळात रितेशने houseful, धमाल, एक व्हिलन, लयभारी, माऊली यांसारखे हिंदी, मराठी चित्रपट केले. तर जिनीलियाने चित्रपटापासून थोड लांब राहून आपला पूर्ण वेळ फॅमिलीला दिला. त्यांच्या सुखी संसारात रियान आणि राहील ही दोन मुले आहेत. दरम्यान च्या काळात या दोघांनी मिळून मुंबई फिल्म कंपनी हे प्रोडक्शन हाऊस सुरू केले तर देश म्युझिक ची सुरूवात केली. तसेच Imagine या वेगन फूड ब्रॅंड ची निर्मिती केली.
अन् आता तब्बल 20 वर्षा नंतर रितेश -जिनिलीया देशमुख ही अस्सल मराठमोळी जोडी समस्त प्रेक्षकांना वेड लावण्यासाठी थिएटरमध्ये दाखल झाली आहे. यामध्ये रितेश -जिनिलीया हे रियल लाईफ कापल आपल्याला ऑनस्क्रीनही एकत्र काम करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात जिनीलिया अस्खलीत मराठी बोलताना दिसतीये. तर रितेशने अभिनय आणि दिग्दर्शन अशी दुहेरी भूमिका यशस्वीरीत्या पार पाडली आहे. वेड हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असून आतापर्यंत या चित्रपटाने तीन दिवसांत 10 कोटी रुपयांची कमाई केली आहे
