Thursday, May 28, 2026
Latest NewsSports

४ लायन्स् फुटबॉल अ‍ॅकॅडमी, सीएमएस फाल्कन्स्, स्टेपओव्हर फुटबॉल अ‍ॅकॅडमी, साई फुटबॉल अ‍ॅकॅडमी संघांची विजयी कामगिरी !!

पुणे : हॉटफुट स्पोर्ट्स यांच्या तर्फे आयोजित सहाव्या अपोलो हॉटफुट युवा साखळी फुटबॉल स्पर्धेत १२ वर्षाखालील गटात ४ लायन्स् फुटबॉल अ‍ॅकॅडमी, सीएमएस फाल्कन्स्, स्टेपओव्हर फुटबॉल अ‍ॅकॅडमी, साई फुटबॉल अ‍ॅकॅडमी या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून आगेकूच केली.

हॉटफुट अ‍ॅकॅडमीच्या बावधन येथील मैदानावर झालेल्या १२ वर्षाखालील गटाच्या सामन्यांमध्ये रूग्वेद जोशी याच्या एकमेव गोलच्या जोरावर स्टेपओव्हर फुटबॉल अ‍ॅकॅडमी संघाने सिटी एफसीचा १-० असा सहज पराभव केला. ४ लायन्स् फुटबॉल अ‍ॅकॅडमी ब संघाने सलग दोन विजयांची नोंद केली. ४ लायन्स् फुटबॉल अ‍ॅकॅडमीने लौकिक फुटबॉल अ‍ॅकॅडमीचा ४-० असा सहज पराभव केला. शौर्य मेहता याने २ गोल, स्वर्णिम भट आणि सार्थक जोशी यांनी गोलपूर्ण कामगिरी केली. सार्थक जोशी याने केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर ४ लायन्स् फुटबॉल अ‍ॅकॅडमी ब संघाने स्टेपओव्हर फुटबॉल अ‍ॅकॅडमीचा १-० असा पराभव करून आगेकूच केली.

याच गटाच्या सामन्यात सीएमएस फाल्कन्स् संघाने सलग तीन विजयाची नोंद केली. अर्जुन सिंग याने केलेल्या गोलांच्या जोरावर सीएमएस फाल्कन्स् संघाने गेम ऑफ गोल फुटबॉल अ‍ॅकॅडमीचा १-० असा पराभव केला. सीएमएस फाल्कन्स् संघाने दुसरा पराभव बिटा स्पोर्ट्सचा ५-२ असा केला. सैफ टी. याने दोन गोल, हर्षित देसाई, अर्जुन सिंग आणि पार्थ कुलकर्णी यांनी प्रत्येकी एकेक गोल केला. सीएमएस फाल्कन्स् संघाने तिसरा विजय मॅथ्यु फुटबॉल अ‍ॅकॅडमीच्या विरूध्द ३-१ असा मिळवला. निर्वाण नायर, हर्षित देसाई, आणि अर्जुन सिंग यांनी एकेक गोल करून संघाला विजयी केले.

स्पर्धेचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः १२ वर्षाखालील गटः
१) स्टेपओव्हर फुटबॉल अ‍ॅकॅडमीः १ (रूग्वेद जोशी) वि.वि. सिटी एफसीः ०;
२) ४ लायन्स् फुटबॉल अ‍ॅकॅडमी बः ४ (शौर्य मेहता २, स्वर्णिम भट, सार्थक जोशी) वि.वि. लौकिक फुटबॉल अ‍ॅकॅडमीः ०;
३) साई फुटबॉल अ‍ॅकॅडमीः २ (योग्य झा, अर्पण झावरे) वि.वि. सिटी एफसीः ०;
४) ४ लायन्स् फुटबॉल अ‍ॅकॅडमी बः १ (सार्थक जोशी) वि.वि. स्टेपओव्हर फुटबॉल अ‍ॅकॅडमीः ०;
५) उत्कर्ष क्रिडा मंचः ४ (कुशल बी. ३, आरूष एस.) वि.वि. लौकिक फुटबॉल अ‍ॅकॅडमी अः ०;
६) सीएमएस फाल्कन्स्ः १ (अर्जुन सिंग) वि.वि. गेम ऑफ गोल फुटबॉल अ‍ॅकॅडमीः ०;
७) सीएमएस फाल्कन्स्ः ५ (सैफ टी. २, हर्षित देसाई, अर्जुन सिंग, पार्थ कुलकर्णी) वि.वि. बिटा स्पोर्ट्सः २ (सोहम एस., अर्णव जोशी);
८) पुणे एफसीः २ (तरंग जी., शर्वरी शिंदे) वि.वि. गेम ऑफ गोल फुटबॉल अ‍ॅकॅडमीः ०;
९) सीएमएस फाल्कन्स्ः ३ (निर्वाण नायर, हर्षित देसाई, अर्जुन सिंग) वि.वि. मॅथ्यु फुटबॉल अ‍ॅकॅडमीः १ (अर्णव जोशी);

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading