रुपाली पाटील ठोंबरे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्तेपदी नियुक्ती
पुणे :राष्ट्रवादी काँग्रेसच्याफायरब्रॅन्ड नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा विद्या चव्हाण यांनी दिले आहे.
रुपाली पाटील या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकीटावर पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आल्या होत्या.त्यांनी मागील वर्षी डिसेंबरमध्ये मनसेला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
त्यानंतर शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्या आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जात आहेत.त्यामुळे त्यांना पक्षनेतृत्त्वाकडून विशेष जबाबदारी सोपवण्यात आल्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत याचा पक्षाला चांगला फायदा होणार आहे.
