Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्यातील रिक्षाचालकांचा संप 11 डिसेंबर पर्यंत स्थगित

पुणे : येत्या  10 डिसेंबर पर्यंत शहरातील अवैध बाईक टॅक्सी ॲपवर कारवाई करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर रिक्षाचालकांनी सोमवारी सायंकाळी संप मागे घेतला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानुसार हवेली तहसीलदार तृप्ती कोलते यांनी आंदोलन स्थळी येऊन रिक्षाचालकांची भेट घेतली. त्यावेळी कोलते यांनी आश्वासन दिल्यानंतर रिक्षा चालकांनी संप मागे घेतला आहे. परंतु 10 डिसेंबर पर्यंत बाईक टॅक्सी ॲप बंद झाले नाही, तर रिक्षा चालक पुन्हा आंदोलन करतील, असा इशारा रिक्षा चालकांनी दिला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading