Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

तरुणाईच्या उत्साहात संविधान परिषद संपन्न

पुणे:संविधान दिनानिमित्त संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवार, दि. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी संध्या. ६ वाजता एस एम जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे “संविधान युवा परिषद” झाली. हॉल तुडुंब भरला होता. असंख्य नवीन चेहरे कार्यक्रमाला होते. तरुणाईने गर्दी केली होती. तरुण युवा कार्यकर्त्यांची चारही विषयातील मांडणी सखोल आणि पुढील दिशेने घेऊन जाणारी होती. अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांची भाषणे दिशादर्शक आणि व्यापकतेचे भान देणारी होती.

परिषदेचे आयोजन प्रा. मधु दंडवते वाचनालय व अभ्यासिका, महाराष्ट्र अंनिस शिवाजीनगर पुणे शाखा, छात्रभारती विद्यार्थी संघटना व अभ्यासिका विद्यार्थी समिती यांनी केले होते. अध्यक्षीय भाषण प्रा. सुभाष वारे (संविधानाचे अभ्यासक) यांनी केला. सुभाष लोमटे (विश्वस्त सचिव, एस. एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशन) यांनी मार्गदर्शन केले. “वैज्ञानिक दृष्टिकोन आणि भारतीय संविधान” या विषयावर विशाल विमल यांनी (राज्यपदाधिकारी, महा. अंनिस ) मांडणी केली. “शिक्षणहक्क आणि संविधान” या विषयावर संपदा डेंगळे (कार्यकर्ती, छात्रभारती) यांनी मांडणी केली. “असंघटित क्षेत्रातील रोजगार आणि संविधानाचा सांगावा” या विषयावर अक्षय राऊत (कार्यकर्ते, अविस) यांनी मांडणी केली. “नोकऱ्या स्पर्धा परीक्षा आणि सरकारची जबाबदारी” या विषयावर शेखर सोनार (कार्यकर्ते, अभ्यासिका) यांनी मांडणी केली

परिषदेचे प्रास्ताविक फाउंडेशनचे कार्यकारी समिती सदस्य इब्राहीम खान यांनी केले. प्रतीक्षा बांगर, छाया काविरे, नम्रता ओव्हाळ, ओंकार मोरे यांनी ठराव मांडले. ते ठराव सुचनांसह मंजूर झाले असून पुढील कार्यवाहीसाठी शासन दरबारी पाठविण्यात येणार आहेत. छात्रभारतीच्या कार्यकर्ते प्रफुल्ल कांबळे यांनी गाणे सादर केले. सौरभ शिंपी यांनी प्रास्ताविका वाचन केले. सूत्रसंचलन घनश्याम येणगे यांनी केले. आभारप्रदर्शन जुगल माकम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी फाउंडेशनचे सहसचिव उपेंद्र टण्णू, व्यवस्थापक राहुल भोसले, किरण पाटील, संतोष केंगले, स्वप्नील भोसले, पुष्पा क्षीरसागर, अरिहंत अनामिका, अविनाश इंगळे, क्रांती यादव, भीमराव येरगे यांचे सहकार्य मिळाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading