fbpx

महापालिकेतील अधिका-यांची दालने संविधान दिनापर्यंत नागरीकांसाठी दरवाजा मुक्त करावी – आम आदमी पार्टी

पुणे : ज्या नागरीकांच्या कराच्या पैशावर महापालिका चालते. त्याच नांगरिकां मात्र प्रवेशासाठी प्रवेशव्दाराजवळ कंत्राटी सुरक्षा रक्षका बरोबर प्रवेशासाठी हुज्जत घालावी लागते. तसेच नागरीकांच्या हक्काच्या अधिकाराच्या सेवा सुविधा मिळवण्यासाठी नागरीकच रांगेत तिष्ठत उभे राहावे लागते. यावेळी माजी सैनिक, जेष्ठ नागरिक, दिव्यांग, विधवा, महिला कोणाचीहि पर्वा केली जात नाही. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतील अधिका-यांची दालने संविधान दिना (26 नोव्हेंबर) पर्यंत नागरीकांसाठी दरवाजा मुक्त करावी, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने आज निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

दरवाजे काढल्याने भ्रष्टाचाराला तर आळा बसेलच व बिचा-या कंत्राटी सुरक्षा रक्षकांवरील अतिरिक्त ताण आपोआपच कमी होईल. त्याची संख्या ही कमी लागेल, मनपाच्या तिजोरीत भरच पडेल. महिला कर्मचाऱ्यांसाठीच्या विशाखा समितीची सुध्दा गरज उरणार नाही. तरी, सदर दालनांचे दरवाजे काढण्याने मनपा, नागरीक यांचे हितच होणार असल्याने आणि मनपाची प्रतिमा अधिक सुधारणार असल्याने त्यासंबंधीचे आदेश त्वरित पारित करावेत,व संविधान दिनाच्या पर्यंत ते दरवाजे काढून नागरीकांना पारदर्शी कारभाराचे आश्वस्त करावे

Leave a Reply

%d bloggers like this: