Saturday, April 4, 2026
BusinessLatest News

आयसीआयसीआय बँकेतर्फे गिफ्ट सिटी शाखेत एनआरआयसाठी दोन नवी उत्पादने लाँच

मुंबई – आयसीआयसीआय बँकेने आज गुजरातस्थित उदयोन्मुख जागतिक आर्थिक आणि आयटी सेवा केंद्र असलेल्या गिफ्ट सिटी शाखेत एनआरआयसाठी लोन अगेन्स्ट डिपॉझिट्स (एलएडी) आणि डॉलर बाँड्स ही दोन नवी उत्पादने लाँच केली.

या लाँचविषयी आयसीआयसीआय बँकेच्या आंतरराष्ट्रीय बँकिंग समूहाचे प्रमुख श्री. श्रीराम एच. अय्यर म्हणाले, ‘आयसीआयसीआय बँकेमध्ये आम्ही ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सातत्याने नव्या सेवा लाँच करत असतो. या धोरणाशी सुसंगत राहात आम्ही गिफ्ट सिटी शाखेद्वारे एनआरआय ग्राहकांसाठी लोन अगेन्स्ट डिपॉझिट्स (एलएडी) आणि डॉलर बाँड्स ही उत्पादने लाँच केली आहे. एनआरआय ग्राहकांमध्ये परदेशी करन्सी बाँड्सचा पसंतीच्या गुंतवणूक पर्यायांत समावेश होतो. आम्हाला ग्राहकांना डिजिटल बँकिंगचा सोयीस्करपणा तसेच सफाईदार अनुभव द्यायचा आहे. व्यवसायाचा विस्तार करत असतानाच विविध प्रदेशांतील ग्राहकांसाठी नियम व तरतुदींशी सुसंगत राहात मूल्यनिर्मिती करण्यावर आमचा भर राहील.’

या योजनांची महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे –

  • लोन अगेन्स्ट डिपॉझिट (एलएडी) – एलएडी म्हणजे भारतात असलेल्या ठेवीवर (रूपी एनआरई एफडीसह) परकीय चलनात दिलेले कर्ज. ग्राहकांना त्यांच्या टर्म ठेवी वेळेआधीच बंद न करता लघुकालीन रोख गरजांसाठी एलएडीचा लाभ घेता येतो आणि ठेव मोडल्याबद्दल दंडही भरावा लागत नाही. त्यांच्या ठेवीच्या मूल्याच्या ९५ टक्के कर्ज मिळवता येईल. कागदपत्रांची प्रक्रिया सोपी असून ग्राहकांना निश्चित किंवा फ्लोटिंग व्याज दरात फ्लेक्सिबल कालावधी मिळू शकतो.
  • डॉलर बाँड्स – एनआरआयसाठी हा गुंतवणुकीचा आणखी एक पर्याय आहे, ज्यामध्ये त्यांना गिफ्ट सिटीतील आयसीआयसीआय बँकेच्या माध्यमातून डॉलर बाँड्स बुक करता येतील. बँकेद्वारे ५० प्रतिष्ठित इश्यूअर्स/कंपनीजना हे बाँड उपलब्ध केले जातील.
  • त्याशिवाय गिफ्ट सिटीमध्ये एनआरआय ग्राहकांसाठी पुढील उत्पादने उपलब्ध आहेत –
  • ग्लोबल करंट अकाउंट – हे बिगरव्याजी खाते असून त्यात किमान थकबाकी रकमेची आवश्यकता नसते. यामुळे एनआरआयना भारतात युएसडी, युरो, जीबीपी अशा परकीय चलनात पैसे ठेवण्यास मदत होते.
  • जागतिक बचत खाते – एनआरआयना छोट्या कालावधीसाठी पैसे ठेवता येतात आणि या बचत खात्यात व्याज मिळवता येते.
  • टर्म ठेवी – या ठेवी फॉरिन करन्सी नॉन- रेसिडेंट (एफसीएनआर) ठेवीसमान असून त्याचा किमान लॉक- इन कालावधी भारतातील इतर एफसीएनआरसाठी असलेल्या एका वर्षाच्या तुलनेत केवळ सात दिवसांचा आहे. ग्राहकांना युएसडी, युरो, जीबीपी अशा परकीय चलनात ठेवी ठेवता येतात.

त्याशिवाय आयसीआयसीआय बँकेच्या गिफ्ट सिटी येथील शाखेद्वारे कॉर्पोरेट कंपन्यांना व्यवहारांचे बँकिंग, करंट खाती, परकीय चलनातील ठेवी, ट्रेड फायनान्स (आयातदार व निर्यातदारांसाठी), एक्सटर्नल कमर्शियल बॉरोइंग आणि फॉरेन करन्सी टर्म कर्जांसाटी कॉर्पोरेट वित्त सुविधा दिल्या जातात.

अधिक माहिती व गिफ्ट सिटीतील आयसीआयसीआय बँकेच्या सेवा व उत्पादनांचा लाभ घेण्यासाठी कृपया रिलेशनशीप मॅनेजरला संपर्क साधा किंवा भेट द्या www.giftcity.icicibank.com

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading