fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

छत्रपती शिवाजी महाराज, हेच आमचे हिरो आहेत -उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राज्यभर निषेध होत आहे. ‘जोपर्यंत चंद्र-सूर्य-तारे आहेत, तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आमचे आणि देशाचे आदर्श असणार आहेत. आजच्या भाषेत सांगायचे झाले.तर छत्रपती शिवाजी महाराज, हेच आमचे हिरो आहेत. असे वक्तव्य भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केले.

यावेळी भाजप नेते सुधांशू त्रिवेदी यांच्या वादग्रस्त विधानाबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी फडणवीसांनी आपण त्रिवेदी यांचं वक्तव्य नीट ऐकलेलं आहे. यामध्ये त्यांनी कुठल्या पद्धतीने महाराजांनी माफी मागितलीय, असं म्हटलेलं नाही, अशी भूमिका मांडली.

पुण्यात राज्य पोलिस क्रीडा प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. आम्ही सत्तेत असताना हा प्रस्ताव मार्गी लावण्यात येणार होता, मात्र कोरोना संसर्गमुळे या प्रस्तावाला काही प्रमाणात विलंब झाला. आता पुण्यात अत्याधूनिक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. लवकरच याचे काम सुरू होईल, असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
पोलिस दलातील बदल्याविषयी नाराजी असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या नियमांना धरुनच केल्या आहेत.असे फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading