Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का युवतीसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

पुणे : ठाकरेगटाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं उघड आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर आरोप करत अनेक बड्या नेत्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. अशातच आता शिवसेनेची  यंग ब्रिगेडही नाराज असल्याचं आता उघड झालं आहे. युवतीसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. युवती सेना सहसचिव  शर्मिला येवले यांनी आपल्या समर्थकांसह पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली.

शर्मिला येवले म्हणाल्या,मागच्या काही दिवसात पक्षात जे सुरु आहे. त्यावर युवती सेनेच्या पदाधिकारी नाराज आहेत. अडचणीच्या काळात पक्ष सोडणं योग्या नाही पण पदाधिकारी राजीनामा देण्यावर ठाम आहेत. 35 पदाधिकारी युवतीसेना पदाचा राजीनामा देत आहोत.असं शर्मिला येवले म्हणाल्या.

शहर, तालुका, जिल्हा स्तरावर काम करणाऱ्या तरूणी नाराज आहेत. तरूणी, महिला यांचा राजकारणातील वावर कमी आहे. सध्या ग्रामीण भागातही तरूणी पुढे येत आहेत. राजकारणात सक्रीय होत आहेत. ही चांगली आहे. पण नेतृत्व करताना स्थानिक पातळीवरील महिला-तरूणींना होणार त्रास लक्षात घेतला पाहिजे.पक्षातील वरिष्ठ नेते याची दखल घेत नाहीत. त्यामुळे युवा नेत्यांमध्ये नाराजी आहे, असं म्हणत शर्मिला यांनी आपली नाराजी बोलून दाखवली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading