अभाविप साजरा करणार स्त्री शक्ति सप्ताह
पुणे: : 19 नोव्हेंबर म्हणजेच राणी लक्ष्मी बाईंची जयंती. हा दिवस अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्त्री शक्ति दिवस म्हणून साजरा करत असते. मध्य पुणे भाग दि. २१ ते २७ नोव्हेंबर दरम्यान स्त्री शक्ति सप्ताह साजरा करणार आहे. महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना त्यांच्या कलागुणांना वाव देणे, त्याना संधी देणे, व्यासपीठ उपलब्ध करून देणे. हा या सप्ताहा मागचा उद्देश आहे. या सप्ताहात कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम घेतले जाणार आहेत. यामध्ये कर्तृत्ववान महिलांचा सत्कार, ऐतिहासिक भूमिकांवर रील स्पर्धा, रांगोळी, मेहेंदी, चित्रकला आणि निबंध स्पर्धा. याचबरोबर रेड डॉट मूवमेंट जनजागृति, व्याख्यान असे अनेक विषय समाविष्ट आहेत. या सप्ताहाचा समारोप मणिकर्णिका दौडने होईल. यंदा ह्या सप्ताहाचे दुसरे वर्ष आहे. येत्या सोमवारी सप्ताह सुरु होईल. अशी माहिती स्त्री शक्ति सप्ताह प्रमुख, मध्य पुणे नगर सहमंत्री तन्वी खाडिलकर हयांनी दिली.
