Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

रानडे इन्स्टिट्यूटमध्ये मोबाईल व्हिडिओनिर्मिती कार्यशाळा

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातर्फे सर्वसामान्य नागरिकांसाठी विविध विषयांवरील अल्पकालीन कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. त्या अंतर्गत मोबाईल व्हिडिओनिर्मिती कार्यशाळा पुढील आठवड्यात (नोव्हेंबर २३, २४, २५ व २८, २९, ३०, २०२२) या काळात दररोज संध्याकाळी सहा ते आठ या वेळात फर्गसन रस्त्यावरील रानडे इन्स्टिट्यूट परिसरात विभागाच्या सभागृहात होणार आहे. ज्येष्ठ टीव्ही पत्रकार प्रतिभा चंद्रन कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
कार्यशाळेसाठी रू. २००० शुल्क असून १२ उत्तीर्ण झालेली कोणतीही व्यक्ती प्रवेश घेऊ शकते. कार्यशाळेसाठी चांगल्या प्रतीचा व्हिडिओ कॅमेरा असलेला मोबाईल फोन सहभागींकडे असणे आवश्यक आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर एका तुकडीत फक्त वीस जणांना प्रवेश दिला जाईल. सहभागींना उपस्थितीचे प्रमाणपत्र देण्यात येईल.
विद्यापीाठाच्या संकेतस्थळावर कार्यशाळेचा प्रवेश अर्ज उपलब्ध आहे.
पुढील काळात पॉडकास्ट निर्मिती, सोशल मीडिया मार्केटिंग यांसंबंधी कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत अशी माहिती विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख डॉ.उज्वला बर्वे यांनी दिली.

https://events.unipune.ac.in/sites/Workshop_CJ/ या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. अधिक माहितीसाठी या क्रमांकावर ८४०८०५७८९२ संपर्क साधावा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading