fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsSportsTOP NEWS

T20 World Cup -टीम इंग्लंड ठरली ‘वर्ल्ड चॅम्पियन’

मेलबर्न :  पाकिस्ताननं दिलेलं अवघं 138 धावांचं लक्ष्य इंग्लंडनं 5 विकेट्सच्या मोबदल्यात आरामात पार केलं. या विजयासह इंग्लंड टी20 वर्ल्ड कपमध्ये दुसऱ्यांदा चॅम्पियन बनली. पण त्याचबरोबर 30 वर्षांपूर्वी याच ग्राऊंडवर पाकिस्ताननं वन वर्ल्ड कपमधल्या पराभवाचा बदला घेतला. त्याचबरोबर वन डे आणि टी20 वर्ल्ड कप जिंकणारी इंग्लंड ही पहिलीच टीम ठरली. 2019 साली इंग्लंडनं वन डे वर्ल्ड कप जिंकला होता. त्यात आता जोस बटलरच्या टीमनं आणखी एक वर्ल्ड कप ट्रॉफी इंग्लंडला जिंकून दिलं.

इंग्लंडला विजयासाठी 30 बॉल्समध्ये 41 रन्स हवे असताना 16वी ओव्हर टाकण्यासाठी शाहीन आफ्रीदी बॉलिंगला आला. पण या ओव्हरमध्ये फक्त एक बॉल टाकून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅचमध्ये हाच टर्निंग पॉईंट ठरला. त्याच ओव्हरमध्ये उरलेले 5 बॉल टाकण्यासाठी आलेल्या इफ्तिकारच्या बॉलिंगवर इंग्लंडनं 13 धावा वसूल केल्या आणि मॅच इंग्लंडच्या पारड्यात गेली. पुढच्या ओव्हरमध्ये स्टोक्स आणि मोईन अलीनं आणखी 16 धावा फटकावल्या आणि विजय निश्चित केला.

2019 साली बेन स्टोक्सनं एकाकी झुंज देत इंग्लंडला पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनवलं होतं. तोच स्टोक्स पुन्हा एकदा इंग्लिश संघाच्या मदतीला धावून आला. स्टोक्सनं नाबाद खेळी केली त्याचबरोबर पाचव्या विकेटसाठी मोईन अलीसोबत केलेली 47 धावांची खेळी निर्णायक ठरली.

दरम्यान फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध पाकिस्तानी फलंदाजांना फार मोठी कामगिरी करता आली नाही. पाकिस्तानला 20 ओव्हर्समध्ये 8 बाद 137 धावाच करता आल्या. या महत्वाच्या लढतीत शान मसूदनं सर्वाधिक 38 धावा केल्या. तर बाबर आझमनं 32 धावांची खेळी केली. पण सॅम करन (3), जॉर्डन, आदिल रशिद (2) आणि बेन स्टोक्स (1) यांच्या प्रभावी माऱ्यासमोर पाकिस्तानला मोठी मजल मारता आली नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading