क्रस्ना डायग्नोस्टिकतर्फे क्रस्ना शिक्षा अभियान लाँच, सिम्बायोसिस सेंटर ऑफ डिस्टन्स लर्निंगशी सहकार्य
पुणे – क्रस्ना डायग्नोस्टिक्स लि. या भारतातील वेगाने विकसित होणाऱ्या आणि पॅन भारतात कार्यरत असलेल्या डायग्नोस्टिक सेवा पुरवठादार कंपनीने राष्ट्रीय शिक्षण दिवसाच्या निमित्ताने क्रस्ना शिक्षा अभियान लाँच केले असून त्याद्वारे कर्मचाऱ्यांना आपले कौशल्य उंचावण्यासाठी मदत केली जाणार आहे. उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीने सिम्बायोसिस सेंटर ऑफ डिस्टन्स लर्निंगशी सहकार्य केले असून त्याद्वारे व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान, कायदे, डिझाइन, मानवता आणि सामाजिक शास्त्र अशा विषयांशी संबंधित ३५+ अभ्यासक्रम उपलब्ध केले जाणार आहेत.
कर्मचाऱ्यांना काम करताना शिकण्यासाठी प्रोत्साहन देणे हे या कॅम्पेनचे ध्येय आहे. क्रस्ना शिक्षा अभियान क्रस्ना डायग्नॉस्टिक्सच्या सर्व ३०००+ कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असून त्यांना सिम्बायोसिस सेंटर ऑफ डिस्टन्स लर्निंगमध्ये (एससीडीएल) सवलतीच्या दरात प्रवेश घेता येईल तसेच ईएमआय पेमेंट किंवा व्याजमुक्त कर्ज अशा अतिरिक्त संधींचाही वापर करता येईल. क्रस्ना डायग्नोस्टिक्सच्या कर्मचाऱ्यांनी क्रस्ना शिक्षा अभियानात सक्रिय कुतूहल दर्शवले असून ते या उपक्रमाविषयी उत्सुक आहेत.
कंपनीच्या धोरणाविषयी क्रस्ना डायग्नोस्टिक्सच्या व्यवस्थापकीय संचालक पल्लवी जैन म्हणाल्या, ‘सिम्बायोसिस सेंटर ऑफ डिस्टन्स लर्निंगसह करण्यात आलेल्या भागिदारीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांचे कौशल्य उंचावण्यासाठी चांगले व्यासपीठ मिळवून देण्याचा आमचा हेतू आहे. यातून त्यांच्या आमच्या व्यवसायाशी पूरक क्षमता अधिक बळकट होतील आणि पर्यायाने संभाव्य रुग्णांना दर्जेदार सेवा मिळतील अशा विश्वास वाटतो.’
या उपक्रमाविषयी क्रस्ना डायग्नोस्टिक्सच्या एचआर आणि अडमिन विभागाचे व्यवस्थापक पंकज वाघ म्हणाले, ‘आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत असून यापूर्वीत ३००+ कर्मचाऱ्यांनी क्रस्ना शिक्षा अभियानासाठी सक्रिय उत्सुकता दर्शवली आहे. ही संख्या नजीकच्या भविष्यात वाढण्याची अपेक्षा आहे. कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’
या उपक्रमाविषयी सिम्बायोसिस सेंटर ऑफ डिस्टन्स लर्निंगच्या (एससीडीएल) संचालक मेजर सोनाली कदम (निवृत्त) म्हणाल्या, ‘ क्रस्ना शिक्षा अभियान हा कर्मचाऱ्यांसाठी उत्पन्न मिळवत असतानाच शिक्षण घेण्याची संधी देणारा कौतुकास्पद उपक्रम आहे. सिम्बायोसिस सेंटर ऑफ डिस्टन्स लर्निंग क्रस्ना डायग्नोस्टिक्सच्या कर्मचाऱ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी बांधील आहे. मला विस्वास वाटतो, की हा उपक्रम क्रस्ना डायग्नोस्टिक्सच्या संस्थापकांचे ध्येय पूर्ण करण्यात आणि सत्कार्य करण्याच्या धोरणाला मोठा हातभार लावेल.’
