Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

आव्हाडांना अटक, हे पाहून मला ब्रिटीश राजवटीचे दिवस आठवतायेत – खासदार सुप्रिया सुळे

मुंबई : ‘हर हर महादेव’ या मराठी चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती दाखवली, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी काही कार्यकर्त्यांसह रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉल येथील शो बंद पडला होता. याप्रकरणी १०० कार्यकर्त्यांसह जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर, ठाणे पोलिसांनी आज जितेंद्र आव्हाड यांना अटक केली आहे. त्यावर आव्हाडांना अटक झाली आहे,.हे पाहून मला ब्रिटीश राज्याचे दिवस आठवतायेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, जर एखादा व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचं दाखवत असेल आणि त्याचा विरोध करण्यासाठी एखादा व्यक्ती आंदोलन करत असेल, आपल्या वेदना मांडत असेल तर अशा व्यक्तीच्या अटकेचं मी स्वागतच करते. आव्हाड ज्या कारणासाठी जेलमध्ये गेले त्याबद्दल मला त्यांचा अभिमानच वाटतो,  असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी कुणावरही आरोप करत नाही. पोलिसांवर दबाव यतोय. यात त्या बिचाऱ्यांची काहीच चूक नाही. मी सत्तेत असो वा नसो मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. त्यामुळे पोलिसांना फोन येतायेत ही शक्यत नाकारता येत नाही.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading