Sunday, June 21, 2026
BusinessLatest News

टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडला महाराष्ट्रात १५० मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यासाठी ‘लेटर ऑफ अवॉर्ड’ मिळाले

पुणे : टाटा पॉवरची उपकंपनी टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडला (टीपीआरईएल) महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन लिमिटेडकडून (एमएसईडीसीएल) महाराष्ट्रात सोलापूरमध्ये १५० मेगावॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारण्यासाठी लेटर ऑफ अवॉर्ड‘ मिळाले आहे. 

ई-रिव्हर्स ऑक्शननंतर झालेल्या टॅरिफवर आधारित स्पर्धात्मक बोली प्रक्रियेमार्फत टीपीआरईएलने हे लेटर ऑफ अवॉर्ड जिंकले आहे. वीज खरेदी करार लागू करण्यात आलेल्या तारखेपासून १८ महिन्यांमध्ये हा प्रकल्प सुरु करण्यात येईल.

हा प्रकल्प मिळाल्याबद्दल टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडचे सीईओ आशिष खन्ना म्हणाले, “१५० मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी एमएसईडीसीएलकडून लेटर ऑफ अवॉर्ड जिंकल्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. अधिक हरित भविष्य साकार करून परिवर्तन घडवून आणण्यासाठी एक पर्यावरणपूरक, शाश्वत इकोसिस्टिम निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेला अनुसरून आहे. जागतिक दर्जाचे सौर प्रकल्प निर्माण करण्याची आमची क्षमता यामधून पुन्हा एकदा दिसून आली आहे.”

या प्रकल्पामुळे आता टीपीआरईएल ची एकूण नूतनीकरणीय ऊर्जा क्षमता ५७८६ मेगावॅटवर पोहोचली आहे, यामध्ये संस्थापित क्षमता ३८७७ मेगावॅट (सौर २९४९ मेगावॅट आणि पवन ९२८ मेगावॅट) आणि १९०९ मेगावॅट क्षमतेचे काम अंमलबजावणीच्या विविध टप्प्यांवर सुरु आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading