fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNE

मेघना काकडे- माने यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

मुंबई, : शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्या हस्ते आज शिवबंधन बांधून अंधेरी पश्चिम वॉर्ड क्र. ६० येथील मेघना काकडे-माने यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला.

मेघना काकडे – माने या पुण्याचे माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या कन्या आहेत. यावेळी शिवसेना सचिव खा. विनायक राऊत, आदेश बांदेकर, मिलिंद नार्वेकर, आ. रवींद्र वायकर, आ. अनिल परब, आ. सचिन अहिर, भाऊ कोरगावकर, उपनेत्या सुषमा अंधारे आदी उपस्थित होतें.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading