Saturday, April 11, 2026
ENTERTAINMENTLatest NewsTOP NEWS

अलिया – रणबीरच्या घरी ‘कन्यारत्न’

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आई बनल्याची गोड बातमी समोर आली आहे. अभिनेत्रीने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आज सकाळी तिला प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता बातमी येतेय ती आलीयाच्या आई होण्याची. तिने मुलीला जन्म दिला असल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे आता हे बॉलिवूडचे क्यूट कपल आता एका गोंडस मुलीचे पालक झाले आहेत.या बातमीमुळे कपुर घरात आनंदाचं वातावरण आहे. हॉस्पिटलमध्ये आलियाला भेटायला आलियाची आई सोनी राजदान आणि नितू कपूर देखील पोहोचल्या आहेत.

आज सकाळी प्रसिद्ध पापाराझी विरल भयानीने  इन्स्टाग्राम अकाउंटवर आलिया आणि रणबीरचा एक व्हिडीओ शेअर केला होता. यामध्ये आलिया आणि रणबीर रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल होताना दिसून आले होते. हे जोडपं आलियाच्या प्रसूतीसाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचलं होतं. रणबीर-आलिया आज सकाळी 7.30 वाजता रिलायन्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. पोस्ट शेअर करत पापाराझींने लिहलं होतं, ‘#aliabhatt आणि #RanbirKapor आज सकाळी 7.30 वाजता गिरगावातील अंबानी हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी पोहोचले आहेत. आलिया भट्ट प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल आहे. ही बातमी जोरदार व्हायरल झाली होती. दरम्यान आता आलिया भट्टने लेकीला जन्म दिल्याची गोड बातमी समोर आली आहे.

आलिया आणि रणबीर एका गोंडस लेकीचे आईबाबा बनले आहेत. त्यामुळे कपूर आणि भट्ट फॅमिलीमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. हे दोन्ही कुटुंबीय सध्या मुलीच्या स्वागताने प्रचंड आनंदी झाले आहेत. बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय जोडप्यांपैकी एक रणबीर कपूर आणि आलिया भट्टने लग्नाच्या अवघ्या 2 महिन्यांनंतरच आपल्या घरी छोटा पाहुणा येणार असल्याची घोषणा केली होती. जूनमध्ये आलियाने सोनोग्राफी रुममधून एक फोटो शेअर करत आपण आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. आलिया आणि रणबीर आपल्या पहिल्या अपत्याच्या स्वागतासाठी प्रचंड उत्सुक होते. आज सकाळी रणबीर-आलिया मुंबईतील रिलायन्स हॉस्पिटलबाहेर दिसून आले होते. आणि आता हे दोघ एका लेकीचे आईबाबा झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading