अभियान प्रतिष्ठानच्या वतीने “दिवाळी भेट फराळ” कार्यक्रम संपन्न
पुणे:अभियान प्रतिष्ठान, गुरुवारपेठ, पुणे यांचे वतीने दरवर्षी प्रमाणे “दिवाळी भेट फराळ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा या कार्यक्रमाचे २३ वे वर्ष होते.
पंचहौद येथील सेंट जॉन्स अनाथ वृद्धाश्रम झालेल्या या कार्यक्रमास डॉ.कल्याणजी गंगवाल, कर्नल संभाजीराव पाटील, निवृत्त ACP भानुप्रताप , डॉ.मिलिंद भोई, उदय जगताप, सुनील खाटपे, सतीश मोहोळ आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दरवर्षी महिला पोलीस, परिचारिका, सफाई कर्मचारी महिला यांचा साडीचोळी, भेटवस्तू देऊन पाहुण्यांसोबत फराळ असा कार्यक्रम असतो.
यावर्षी खडक पोलीस उपनिरीक्षक सौ.पवारमॅडम, सौ.वैशाली तोटेवार, पोलीस नाईक सौ.वीरनक, पोलीस शिपाई सौ.जाधव, परिचारिका सौ.सुजाता चिंतल व ज्युपिटर हॉस्पिटलच्या ५ नर्सेस, १५महिला सफाई कर्माचारी यांच्यासह वृद्धाश्रमाच्या संचालिका सुजन कदम अनाथ वृद्ध महिलांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी अ.भा.मराठा महासंघाच्या राज्य व राष्ट्रीय पातळीवर निवड झालेल्या बाळासाहेब अमराळे, अजय पाटील, संजय पासलकर यांचाही गौरव करण्यात आला.
या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप भोसले, रोहन पायगुडे, अभिजित म्हसवडे, राजेश पवार, राहुल गायकवाड, पंकज शहा व इतरांनी केले.
