Wednesday, August 26, 2026
Latest NewsSports

दुसर्‍या ‘विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेचे ३ नोव्हेंबर पासून आयोजन !

पुणे : स्पोर्टसफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित दुसर्‍या ‘विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत ५ संघ सहभागी होत असून ही स्पर्धा ३ नोव्हेंबर ते ११ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत क्रिकेट नेक्स्ट अ‍ॅकॅडमी मैदान, मुकूंदनगर येथे होणार आहे.

या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पोर्टसफिल्ड मॅनेजमेंटचे संचालक सनी मारवाडी यांनी सांगितले की, युवा क्रिकेट खेळाडूंसाठी तसेच त्यांच्या गुणांना वाव देण्यासाठी, संधी देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील खेळाडुंसाठी आयोजित करण्यात आलेल्या या दुसऱ्या विंटर स्पर्धेत स्थानिक क्रिकेट क्लब क्षेत्रातील ५ संघ झाले आहेत. खेळाडूंच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य तसेच समृध्दीसाठी ही स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्‍या या स्पर्धेत स्पेशलाईझ क्रिकेट क्लिनिक, निंबाळकर वॉरीयर्स, युनिक स्पोर्ट्स क्लब, फन फिटनेस क्रिकेट अ‍ॅकॅडमी आणि थर्ड आय स्पोर्ट्स या ५ संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे.

स्पर्धेतील विजेत्या संघाला आणि उपविजेत्या संघाला मेडल्स् आणि करंडक मिळणार आहे. या शिवाय स्पर्धेत वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात येणार आहेत. सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज, क्षेत्ररक्षक, उदयोन्मुख खेळाडू, मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू अशी पारितोषिके असणार आहेत. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिकांची रेलचेल या स्पर्धेत असणार आहे.

स्पर्धेचा उद्धघाटनाचा सामना थर्ड आय स्पोर्ट्स आणि निंबाळकर वॉरीयर्स या दोन संघांमध्ये होणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading