दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊद्या अब्दुल सत्तार यांचे आदित्य ठाकरे यांना चॅलेंज
पुणे : राज्याचे कृषी मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर ते सातत्याने आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान देत आहेत. आदित्य ठाकरे व अब्दुल सत्तार यांच्यात दररोज काहीतरी वेगवेगळ्या गोष्टीमुळे शाब्दिक चकमक होत आहे. नुकतेच अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांनी वरळी मधून राजीनामा द्यावा मी सिल्लोड मधून देतो असं आव्हान दिल होतं. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले,
मी म्हणल होतं की तुम्ही वरळीतून राजीनामा द्या आणि मी सिल्लोडमधून राजीनामा देतो. मग त्यांच्या एका नेत्याने वक्तव्य केलं तुम्हाला 2 वर्षानंतर कळेल की निवडणूक काय असते. मी म्हणलं दोन वर्ष कशाला वाट बघायची आता टेस्ट मॅच होऊन जाऊद्या आणि मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल. आता ही माझं चॅलेंज आहे. असे आवाहन कृषि मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांना पुण्यात पत्रकारांशी बोलताना केले.
वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्था, पुणे येथे ‘हॉर्टिकल्चर व्हॅल्यू चेन फंक्शन’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.याच उद्घाटन तोमर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रदर्शनाची पाहणी करताना सत्तार बोलत होते.
राज्याच्या सत्तासंघर्ष सुरू झाला तेव्हापासून शिंदे-ठाकरे गटातील नेते एकमेकांवर आरोप -प्रत्यारोप करताना दिसत आहे. त्यातच कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची सतत मागणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी जर परवानगी दिली तर आठ दिवसातच राजीनामा देईल.असे
अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.
शेतकऱ्यांना राज्य सरकार दुप्पट नुकसान भरपाई देईल, असं मला वाटत, असं स्पष्ट मत त्यांनी यावेळी मांडलं. महाराष्ट्र असं राज्य आहे जिथे जुलै आणि ऑगस्ट मध्ये नुकसान झाल्यास सप्टेंबर मध्ये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळते. ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे तो सरकारच्या मदतीपासून वंचित राहणार नाही याबाबत मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आहे आणि मला मी स्वतः अनेक जिल्ह्यांमध्ये जाऊन नुकसाग्रस्तांना भेट दिली. अवकळी पावसामुळं शेतकरी निराश झाला होता त्यांना आधार देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केला आहे. असे सत्तार म्हणाले.
एकनाथ शिंदे हे सुद्धा शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे शेजाऱ्यांची जाणिव आहे. शेतकऱ्यांना साडे चार हजार कोटी पेक्षा जास्त मदत आता पर्यंत केली आहे. आता झालेल्या नुकसानांचे पंचनामे आले की शेतकऱ्यांना मदत मिळेल. नुकसान झालेला एक ही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. विरोधी पक्षाला काय बोलायचं काय नाही बोल्याचं तो त्यांचा अधिकार आहे. असं सत्तार म्हणाले आहेत.
तर उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावर देखील अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंचा औरंगाबादचा अडीच तासाचा दौरा होता. त्यामध्ये 24 मिनिटे शेतकऱ्यांच्या बांधावर आले त्यांना 24 मिनटात काय दिसलं मला काही कल्पना नाही पण आम्ही 24 दिवसापासून शेतकऱ्यांसोबत होतो. राजकारणासाठी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन फोटो काढणं म्हणजे वेगळी गोष्ट आहे, ते स्वतः जेव्हा शेतकरी होते तेव्हा त्यांनी 2019 मध्ये अनेक घोषणा केल्या. पण त्याची त्यांना आठवण राहिली नाही. असं म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.
