एनआरएआय तर्फे सदस्यांसाठी खास मेजवानी
पुणे: नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडियाज (एनआरएआय) पुणे चॅप्टरने आपल्या सदस्यांसाठी नुकत्याच एका खास मेजवानीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे नाव होते ‘नेटवर्किंग १०१- फन, फूड अँड बेव्हरेज आर्टिस्ट्री’ , डॉटपे समर्थीत हा खास कार्यक्रम व्हेगन लाइफस्टाइल किचन बाणेर-भाजी पाला येथे नुकताच संपन्न झाला.
सप्टेंबरमध्ये राजेश कामथ (संस्थापक, चाणक्य कन्सल्टिंग इनसाइट्स आणि सह-संस्थापक, चिरंजीव गुरुकुल) यांच्यासोबत ‘हाऊ इंडियन हॉस्पिटॅलिटी कॅन लीड द वर्ल्ड थ्रू सेल्फ लीडरशिप’ या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. या चर्चासत्रास मिळालेल्या मोठ्या प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा एनआरएआय पुणे चॅप्टर ने या खास मेजवानीचे आणि कार्यक्रमाचे आयोजन केले होते ज्याला एनआरएआयच्या सदस्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी प्रख्यात डियाजिओ मिक्सोलॉजिस्ट, ओ आय ब्रुअरीचे पुण्यातील नवीन ब्रूज, शॅंडॉन आणि पुण्याचे गिटार वादक रॉबी वुड यांनी या कार्यक्रमास खास बनविले. यावेळी रिस्टा पीओएसचे एक ब्रेकआउट सेशन देखील झाले, जिथे उपस्थितांना त्यांचा व्यवसाय स्टॉरंट्स आणि क्लाउड किचन व्यवस्थापित करण्यासाठी आणि त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी उपयोगी सॉफ्टवेअरच्या फायद्यांबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची संधी मिळाली. याचसोबत एनआरएआय च्या नवीन वन अॅप लॉन्चवर देखील चर्चा करण्यात आली आणि आगामी काळातील इव्हेंट तसेच मलका स्पाइसच्या एफएसएसएआय ट्रेनिंग बद्दल तपशीलवार चर्चा केली गेली. एनआरएआए ही देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये चॅप्टरच्या स्वरूपात अस्तित्वात असलेली संस्था आहे, जी ५,००,००० हून अधिक रेस्टॉरंट्सचे प्रतिनिधित्व करते आणि त्यांना त्यांचे ब्रँड आणि व्यवसाय एकत्रितपणे वाढविण्यात मदत करते. त्याचप्रमाणे, एनआरएआय पुणे चॅप्टर सदस्यत्वाचा विस्तार करून , अतिथींना शिक्षण आणि नेटवर्किंगच्या संधी देऊन शहरात अद्वितीय समुदाय निर्माण करण्यासाठी कार्यरत आहे. एनआरएआय पुणे चॅप्टरचे अध्यक्ष प्रफुल्ल चंदावरकर (चॅप्टर हेड आणि मलाका स्पाईसचे मालक) आहेत, आणि त्यांच्या समितीमध्ये केविन टेलीस (टॉईट), सिद्धार्थ महाडिक (ले प्लासिर), कुणाल म्हस्के (पेंटहाऊज) आणि निकी रामनानी (द डेली ऑल डे) यांच्यासह पुण्यातील इतर प्रमुख रेस्टॉरंटर्सचाही समावेश आहे. या सत्रानंतर उपस्थितांनी रात्रीचे जेवण, पेये आणि संगीतचा आनंद घेतला.
