Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरद पवार पुढील तीन दिवस रुग्णालयात उपचार घेणार आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. रुग्णालयात दाखल होण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र डॉक्टरांनी सल्ला देताच शरद पवार यांनी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबत पत्रक जारी केले आहे. या पत्रकातील माहितीनुसार, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार हे ३ नोव्हेंबरला शिर्डीला जाणार आहेत. तर शिर्डीला होणा-या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकात लिहिले आहे की, ‘आदरणीय श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ब्रीच कॅन्डी रुग्णालयात पुढील तीन दिवस उपचार घेणार आहेत.

दि. २ नोव्हेंबर २०२२ रोजी सायंकाळी त्यांना डिस्चार्ज मिळेल व दि. ३ नोव्हेंबर २०२२ रोज शिर्डी येथे येणार असून पक्षाच्या दि. ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी होणा-या दोन दिवसीय शिबिरासाठी उपस्थित राहून सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना रुग्णालयाच्या आवारामध्ये गर्दी करु नये असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading