भिवंडीचा अनमोल ठरला डान्स महाराष्ट्र डान्सचा महाविजेता !
भिवंडीतील अनमोल हा डान्स महाराष्ट्र डान्स या डान्स रिऍलिटी शोचा विजेता ठरला आहे. अनमोलचे वडील भिवंडी मध्ये रिक्षा चालक आहेत. आपल्या प्रतिभेने, मेहेनतीने आणि चिकाटीने त्याने या शो मध्ये महाविजेता होण्याचा मान पटकावला. या शोचा महाअंतिम सोहोळा २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान रात्री ९.३० वा. प्रसारित होणार आहे.लहान मुलांच्या उत्साहाने आणि टॅलेन्टने हा कार्यक्रम मोठ्या थाटाने रंगला. तर आतापर्यंतच्या प्रवासा मध्ये लिटिल मास्टर्स यांनी खूप उत्तम परफॉर्मन्स देऊन प्रेक्षकांचे मनरंजन करून मन त्यांची जिंकले आहेत आणि परीक्षकांना आपल्या डान्स द्वारे प्रभावित करून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. सोनाली कुलकर्णी आणि गश्मीर महाजनी हे दोघे ह्या पर्वाचे परीक्षक होते. संदीप पाठक यांनी डान्स महराष्ट्र डान्सचे निवेदन केले. या मंचाने अनेक बालकलाकारांना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी व्यासपीठ दिले. तेव्हा ‘डान्स महाराष्ट्र डान्सचा’ महाअंतिम धमाकेदार सोहळ्या मध्ये सहभागी व्हायला विसरू नका २६ ते २८ ऑक्टोबर बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार रात्री ९:३० ते १०:३० फक्त झी मराठी वर.
