Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest News

कलाकारांनी दिवाळी अधिक उत्‍साहपूर्ण बनवण्‍यासाठी व्‍यक्‍त केला त्‍यांचा आनंद!

दिवाळी सण नवीन आशा व आनंद घेऊन येतो. दिवाळी सण हा अंधारावर प्रकाशाचा, दुष्‍टावर सुष्‍टाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजयाचे प्रतीक आहे. एण्‍ड टीव्‍हीवरील कलाकार आयुध भानुशाली (कृष्‍णा, ‘दूसरी मॉं), योगेश त्रिपाठी (दरोगा हप्‍पू सिंग, ‘हप्‍पू की उलटन पलटन’) आणि शुभांगी अत्रे (अंगूरी भाभी, ‘भाबीजी घर पर है’) या सणाला अधिक खास बनवण्‍यासाठी उत्‍साहासह त्‍यांच्‍या दिवाळी साजरीकरणाबाबत सांगितले. एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘दूसरी मॉं’मध्‍ये कृष्‍णाची भूमिका साकारणारा आयुध भानुशाली म्‍हणाला, ‘’दिवाळी माझा आवडता सण आहे. नवीन कपडे व‍ भेटवस्‍तू खरेदी करण्‍याव्‍यतिरिक्‍त मी माझ्या आजीने बनवलेले विविध प्रकारचे फरसाण व फराळाचा आस्‍वाद घेण्‍यास उत्‍सुक असतो. ती फराळामध्‍ये बेसनचे लाडू, गोड पापडी, चुर्मा लाडू, चकली, चिवडा व नमकपारा बनवते. दिवाळीच्‍या पहिल्‍या दिवशी माझी आई आणि काकी लक्ष्‍मीदेवीचे स्‍वागत करण्‍यासाठी आमच्‍या घराच्‍या प्रवेशद्वारावर रांगोळी काढतो, ज्‍यानंतर सायंकाळी लक्ष्‍मीची पूजा केली जाते आणि माझी चुलत भावंडे फटाके वाजवतात. माझे कुटुंब मला आवाज करणारे फटाके वाजवायला देत नाहीत, म्‍हणून आम्‍ही फक्‍त फुलबाजा व भिंगरी लावण्‍याचा आनंद घेतो. यंदा माझ्यासाठी दिवाळी सण अधिक खास असणार आहे, कारण मी जयपूरमध्‍ये माझी मालिका ‘दूसरी मॉं’च्‍या कुटुंबासोबत सण साजरा करणार आहे. मी गुलाबी शहराच्‍या दिवाळी सेलिब्रेशन्‍सबाबत भरपूर काही ऐकले आहे. येथे काही लोकप्रिय ठिकाणे आहेत, जी दिवाळी सणाला अद्भुतरित्‍या सजवली जातात, जसे जलमहाल, जोहरी बाजार आणि नाहरगड किल्ला इत्‍यादी आणि मी या ठिकाणांना भेट देण्‍यास खूपच उत्‍सुक आहे. माझे आजी-आजोबा मला नेहमी सांगायचे की, गरजूंना मदत केली नाही आणि त्‍यांची दिवाळी अधिक खास बनवल्‍याशिवाय दिवाळी सण अपूर्ण आहे; म्‍हणून दरवर्षी माझे चुलत भावंडं आणि मी दिवाळीच्‍या अगोदर बाहेर जाऊन गरजूंना काही फराळ व खाद्यपदार्थ देणार आहोत.’’

एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘हप्‍पू की उलटन पलटन’मध्‍ये दरोगा हप्‍पू सिंगची भूमिका साकारणारे योगेश त्रिपाठी म्‍हणाले, ‘’मी माझी प्रेमळ पत्‍नी व मुलांसोबत संपूर्ण दिवस व्‍यतित करणार आहे. माझ्या नवजात मुलीची ही पहिलीच दिवाळी आहे आणि मी तिच्‍यासाठी हा क्षण संस्‍मरणीय करणार आहे. मी तिच्‍यासाठी काही छान कपडे आणले आहेत आणि दिवे, रांगोळी व कंदिलसह घराला सुशोभित करणार आहे. काही जवळचे मित्र व नातेवाईक देखील यंदा दिवाळीला आमच्‍यासह डिनरचा आस्‍वाद घेणार आहेत आणि आमच्‍या आनंदामध्‍ये सामील होणार आहेत. म्‍हणून मी आणि माझ्या पत्‍नी सपनाने स्‍वादिष्‍ट मेनू तयार करण्‍याचे ठरवले आहे, जसे पनीरची भाजी, आलु की पुरी, गुजिया व पुलाव. मी उत्तरप्रदेशचा आहे आणि येथे या सणाचे खूप महत्त्व आहे. साजरीकरणाला लवकरच व उत्‍साहात सुरूवात होते. लोक घराची साफसफाई करतात, दिवे व कंदिलासह घराला सजवतात. साजरीकरणाला धनत्रयोदशीसह सुरूवात होते आणि गोवर्धन पूजेपर्यंत सुरू राहते. आम्‍ही सर्व कुटुंब एकत्र सण साजरा करतो. मला आठवते की, माझी आई लक्ष्‍मीमातेला नारळ, फुले व फळे अर्पण करायची आणि घरात समृद्धता येण्‍यासाठी पूजादेवीसमोर नाण्यांची वाटी ठेवायची. आता माझी पत्नी ही परंपरा पाळते. आनंददायी, सुरक्षित आणि आध्यात्मिकतेसह सण साजरा करा. तुम्हा सर्वांना उज्ज्वल आणि आनंददायी दिवाळीच्या शुभेच्छा.” एण्‍ड टीव्‍हीवरील मालिका ‘भाबीजी घर पर है’मध्‍ये अंगूरी भाभीची भूमिका साकारणाऱ्या शुभांगी अत्रे म्‍हणाल्‍या, ‘’अलिकडील काळात मी हरित व पर्यावरणास-अनुकूल दिवाळी साजरा करण्‍यावर विश्‍वास ठेवला आहे. मी सजावटीसाठी कृत्रिम दिव्‍यांऐवजी पणत्‍यांचा वापर करते. शेणापासून बनवलेल्‍या पणत्‍या व दिवे पारंपारिक व आकर्षक रोषणाई देतात आणि मी रांगोळी काढण्‍यासाठी रसायनयुक्‍त रंगांऐवजी फुले व सेंद्रिय रंगांचा वापर करते. दरवर्षी मी घरी विविध प्रकारचा फराळ बनवते आणि माझ्या मुलीला ड्रायफ्रूट खीर खूप आवडते. तसेच दरवर्षी लक्ष्‍मीपूजेला मी सकाळी माझ्या आईला कॉल करते आणि कशी व कोणत्‍या मुहूर्तावर लक्ष्‍मीपूजा करावी याची नोंद करते. मी सर्वांना आनंद मिळो अशी प्रार्थना करते आणि सर्वांना आनंदमय दिवाळीच्‍या शुभेच्‍छा.’’

पहा ‘दूसरी मॉं’ रात्री ८ वाजता, ‘हप्‍पू की उलटन पलटन’ रात्री १० वाजता आणि ‘भाबीजी घर पर है’ रात्री १०.३० वाजता दर सोमवार ते शुक्रवार फक्‍त एण्‍ड टीव्‍हीवर!

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading