Friday, August 28, 2026
Latest NewsPUNE

ड्रेनेज लाईन वरून मनसेचा पालिकेला घोडा

पुणे : कोंढवा खुर्दमधील कोनार्क पुरम सोसायटीसमोर मुख्य रस्त्यांवर नाज हॉटेलशेजारी ड्रेनेज लाईनच्या चेंबरमधून मैलामिश्रित पाणी रस्त्यावर येत आहे. हा कोंढवा परिसरातील मुख्य रस्ता असून मोठ्या प्रमाणात रहदारी असते. त्यामुळे परिसरातील आणि या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत असून संडासाचे पाणी रस्त्यांवर येत असेल तर येथे राहायचे कसे असा सवाल संतप्त नागरिक करत आहेत. त्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. आज मनसेने महापालिकेच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी मनसेनेपुणे महापालिका प्रशासनाला घोडा भेट देत आंदोलन केले.

या आंदोलनाला मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर बाप्पू, वासगावकर यांसह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. साईनाथ बाबर म्हणाले, आज माझ्या प्रभागात ड्रेनेज लाईन मधून भरपूर वास येत आहे.दोन तीन दिवस झाले पाऊस पडत आहे त्यामुळे येथून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकाला त्रास होत आहे. महापालिका प्रशासन याकडे लक्ष देत नाही म्हणून आज आम्ही महापालिका प्रशासनाचा या आंदोलनातून निषेध करत आहोत असे साईनाथ बाबर म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading