Sunday, June 21, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

युवक काँग्रेसच्या वतीने चंद्रशेखर बावकुळे यांना खुळखुळ्याची दिवाळी भेट

पुणे: खुळकुळा न वाजवता सतत वाजत असतो.तसेच भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावकुळे साहेबांचं आहे. विचार न वाजत राहणे,तर नको येऊ तर कोणत्या डब्यात बसू असा घणाघात टीका प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस महाराष्ट्र राज्य रोहन सुरवसे पाटील यांनी यांनी भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावकुळे यांच्यावरच प्रसार माध्यमांशी बोलताना केली आहे.

अंधेरी पोट निवडणूक आम्ही शंभर टक्के जिंकणार होतो, एखाद्याचे निधन झाले असेल तर आणि त्यांच्या परिवारातील सदस्य निवडणूक लढवत असेल तर भाजप उमेदवार देत नाही ही आमची संस्कृती आहे असे बावनकुळे म्हणाले होते.या अनुषंगाने प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी विविध प्रश्न उपस्थित करुन बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली.पुढे बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की बावनकुळे साहेब हे चार दिवस झाले प्रदेश अध्यक्ष आहेत.या आधीचा इतिहास त्यांना माहीत नसावा, कोल्हापूर उत्तर विधानसभा, पंढरपूर विधानसभेच्या वेळी तुमची संस्कृती कुठे गेली होती. आता अंधेरी पूर्व विधान सभेच्या वेळी पराभवाच्या भितीमुळे त्यांची संस्कृती जागी झाली. बावनकुळे साहेब यांचा राजकीय अभ्यास जरासा कमी पडत असल्याचा प्रश्न उपस्थित करत बावनकुळे यांना खुळकुला भेट देणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading