Friday, August 28, 2026
Latest NewsPUNE

अखिल मंडई मंडळात वसुबारसेनिमित्त गोमातापूजन

पुणे : गोमातेच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वसुबारसेच्या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते. अखिल मंडई मंडळाच्या वतीने वसुबारसेनिमित्त गाय – वासरु पूजनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मंडई परिसरातील महिलांनी गोमातेचे पूजन केले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, सुचेता थोरात, वंदना थोरात, पौर्णिमा थोरात, स्वप्ना थोरात, श्रृती चांदणे, मोनाली मोरे, सुजाता शिंदे आदी उपस्थित होते

अण्णा थोरात म्हणाले. दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस. दिवाळीचा पहिला दिवस हा गाई वासरांची दिवाळी म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्‍यात आला आहे. काळानुरुप सणांचे स्वरुप बदलत आहे तरीही भारतीय संस्कृतीचे मूळ जपत पारंपरिक पद्धतीने आज गाई-वासरुचे पूजन मंडई परिसरातील महिलांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading